Lokmat Money >शेअर बाजार > 'ही' दिग्गज होम सर्व्हिस प्रोव्हाडर कंपनी शेअर बाजारात एन्ट्री घेणार, ३००० कोटींचा IPO आणणार

'ही' दिग्गज होम सर्व्हिस प्रोव्हाडर कंपनी शेअर बाजारात एन्ट्री घेणार, ३००० कोटींचा IPO आणणार

जून २०२१ मध्ये कंपनीचं मूल्यांकन २.१ अब्ज डॉलरच्या आसपास होतं. यापूर्वी कंपनीनं २२५ मिलियन डॉलर्सचा फंड रेज केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:07 IST2025-01-14T16:07:44+5:302025-01-14T16:07:44+5:30

जून २०२१ मध्ये कंपनीचं मूल्यांकन २.१ अब्ज डॉलरच्या आसपास होतं. यापूर्वी कंपनीनं २२५ मिलियन डॉलर्सचा फंड रेज केला आहे.

Urban Company giant home service provider salon service company will enter the stock market will bring an IPO of Rs 3000 crores | 'ही' दिग्गज होम सर्व्हिस प्रोव्हाडर कंपनी शेअर बाजारात एन्ट्री घेणार, ३००० कोटींचा IPO आणणार

'ही' दिग्गज होम सर्व्हिस प्रोव्हाडर कंपनी शेअर बाजारात एन्ट्री घेणार, ३००० कोटींचा IPO आणणार

Urban Company IPO: आयपीओ बाजारात स्टार्टअप्स येण्याची प्रक्रिया सुरूच असते. होम सर्व्हिस प्रोव्हायडर अर्बन कंपनी मार्च अखेरपर्यंत आपल्या ३,००० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी ड्राफ्ट सादर करणार आहे. कंपनीनं कोटक महिंद्रा कॅपिटल, गोल्डमन सॅक्स आणि मॉर्गन स्टॅनली यांची आयपीओच्या व्यवस्थापनासाठी नियुक्ती केली आहे. रिपोर्टनुसार, प्रोसस समर्थित कंपनी आयपीओमध्ये नवीन आणि विद्यमान शेअर्स जारी करेल.

२०२१ मध्ये फंड राऊंड

जून २०२१ मध्ये कंपनीचं मूल्यांकन २.१ अब्ज डॉलरच्या आसपास होतं. जून २०२१ मध्ये, स्टार्टअपनं प्रोसस, ड्रॅगनएअर आणि वेलिंग्टन मॅनेजमेंट सारख्या गुंतवणूकदारांच्या नेतृत्वात फंडिंग राउंडमध्ये २५५ मिलियन डॉलर्स उभे केले. होम सर्व्हिस, ब्युटी सलॉन मार्केटची उपस्थिती सिंगापुर, सौदी अरेबियासह परदेशातील बाजारांसह भारतातील ३० पेक्षा अधिक शहरांमध्ये आहे. ५७ हजार भागीदारांसोबत काम करण्याचा अर्बन कंपनीचा दावा आहे.

कंपनीबद्दल माहिती

अर्बन कंपनीच्या वेबसाईटवर त्याच्या गुंतवणूकदारांची माहिती देण्यात आली आहे. दिवंगत रतन टाटा हे या कंपनीतील गुंतवणूकदारांपैकी एक होते. याशिवाय टायगर ग्लोबल, थिंक इन्व्हेस्टमेंट, एसीसीईएल पार्टनर, व्हीवाय कॅपिटल, एलिव्हेशन यांनीही या कंपनीत गुंतवणूक केली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Urban Company giant home service provider salon service company will enter the stock market will bring an IPO of Rs 3000 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.