Reliance Home Finance: अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये सोमवारी तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीच्या शेअरनं सोमवारी १० टक्क्यांचा उच्चांक गाठला, त्यानंतर शेअरचा भाव ३.९८ रुपयांवर पोहोचला. शुक्रवारी तो ३.६२ रुपयांवर बंद झाला होता. कंपनीनं नुकतेच तिमाही निकाल जाहीर केले, त्यानंतर शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
तिमाही निकाल
रिलायन्स होम फायनान्सला चौथ्या तिमाहीत ६८.८ लाख रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. कंपनी अजूनही तोट्यात चालली असली तरी गेल्या वर्षी याच तिमाहीत झालेल्या ६७४.९ लाख रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत ही मोठी सुधारणा आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने आपला तोटा जवळपास ९० टक्क्यांनी कमी केला आहे, हे कंपनीसाठी उत्तम लक्षण आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ तोटा २४.१७ कोटी रुपये झाला, जो गेल्या वर्षी याच कालावधीत ३.५५ कोटी रुपये होता.
३३०० कोटी रुपये फेडले, अनिल अंबानींची कंपनी झाली कर्जमुक्त; ४३८७ कोटी रुपयांचा नफा
एलआयसीचीही गुंतवणूक
ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२४ पर्यंत एलआयसीचा कंपनीत १.५४ टक्के हिस्सा होता. गेल्या पाच दिवसांत या शेअरमध्ये २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या ६ महिन्यांत त्यात ६६ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. पण वर्षभरात त्यात १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या ५ वर्षात गुंतवणूकदारांना २६१ टक्के परतावा दिलाय. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५.८३ रुपये आहे. तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २.१५ आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)