Lokmat Money >शेअर बाजार > UPI कंपनी BharatPe आणणार IPO, जाणून घ्या तुमच्या कामाची महत्त्वाची माहिती

UPI कंपनी BharatPe आणणार IPO, जाणून घ्या तुमच्या कामाची महत्त्वाची माहिती

BharatPe IPO : आयपीओची (Initial Public Offering) तयारी करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत भारतपेचा समावेश झाला आहे. जाणून घ्या कधी येणार कंपनीचा आयपीओ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 09:57 IST2025-01-15T09:56:53+5:302025-01-15T09:57:25+5:30

BharatPe IPO : आयपीओची (Initial Public Offering) तयारी करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत भारतपेचा समावेश झाला आहे. जाणून घ्या कधी येणार कंपनीचा आयपीओ.

UPI company BharatPe will bring IPO know important information before investing | UPI कंपनी BharatPe आणणार IPO, जाणून घ्या तुमच्या कामाची महत्त्वाची माहिती

UPI कंपनी BharatPe आणणार IPO, जाणून घ्या तुमच्या कामाची महत्त्वाची माहिती

BharatPe IPO : आयपीओची (Initial Public Offering) तयारी करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत भारतपेचा समावेश झाला आहे. दरम्यान, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नलिन नेगी यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीच्या महसुलात सुमारे ३० टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कंपनीनं चालू आर्थिक वर्षात करपूर्व पॉझिटिव्ह उत्पन्नाचं (एबिटडा) उद्दिष्ट ठेवलंय. दीड ते दोन वर्षांत आयपीओ (Initial Public Offering) आणण्याचा कंपनीचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारतपे युनिटी स्मॉल फायनान्स बँकेतील आपला हिस्सा कमी करत आहे आणि संभाव्य खरेदीदारांचा शोध घेण्यासाठी रॉथ्सचाईल्डची नेमणूक केली आहे. भारतपे छोट्या अधिग्रहणांसाठी तयार असून ज्या कंपन्या मूल्य जोडतील त्यासाठी तयारही असल्याचं त्यांनी म्हटलंय.

आवश्यक गोष्टींवर काम

अनेक फिनटेक कंपन्या सुरू झाल्या आहेत, काही चांगली कामगिरी करत आहेत, काही नाहीत. काहींकडे योग्य अर्थसहाय्य किंवा संसाधनं नाहीत, आम्ही त्यांच्याकडेही पाहत आहोत. बाजाराच्या परिस्थितीनुसार पुढील दीड ते दोन वर्षांत आयपीओ आणण्याचा विचार कंपनी करत आहे, असं नेगी म्हणाले. आयपीओच्या तयारीसाठी कंपनीने ऑपरेशन्स, कंप्लायंस आणि फायनान्शिअल्सवर काम सुरू केले आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर आर्थिक स्थिती चांगली आहे आणि कंपनी पूर्णपणे नियंत्रण आणि ऑपरेशनल पैलूंवर लक्ष केंद्रित करते. गेल्या दीड वर्षात आम्ही आमच्या प्रणाली आणि प्रक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. मात्र, अजून ही काही कामं बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं.

को ब्रँडेड क्रेडिट कार्ड

आर्थिक वर्ष २०२३-२४ हे भारतपेसाठी महत्त्वपूर्ण वर्ष असल्याचे सांगून ते म्हणाले की, कंपनीनं ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रथमच पॉझिटिव्ह एबिटडा (व्याज, कर, अवमूल्यन आणि ट्रेडमार्क, पेटंट आणि इतर मालमत्तेच्या वेळेसह खर्च कमी होण्याचा अंदाज घेण्यापूर्वीचे उत्पन्न) उत्पन्न मिळवलंय. २०२४-२५ मध्ये करपूर्व उत्पन्नाच्या पातळीवर फायदा होताना दिसत आहे. मला आशा आहे की जानेवारीमध्ये आम्ही को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लाँच करू आणि आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी आम्ही कर्ज सुविधा उत्पादन देखील आणू, असंही ते म्हणाले.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: UPI company BharatPe will bring IPO know important information before investing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.