Upcoming IPO in Next Week: शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांसाठी येणारा आठवडा महत्त्वाचा आहे. या आठवड्यात चार कंपन्यांचे आयपीओ (Initial Public Offering) बाजारात येणार आहेत. यापैकी तीन कंपन्या मेनबोर्ड सेगमेंटमधील असून, एक कंपनी एसएमई सेगमेंटमधील आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष या सर्व आयपीओंकडे लागले आहे.
1. Innovision IPO
Innovision कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी १० मार्च ते १२ मार्च दरम्यान खुला राहणार आहे. कंपनीने प्रति शेअर ५२१ ते ५४८ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. आयपीओमध्ये एका लॉटमध्ये २७ शेअर्स असतील. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४,७९६ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून सुमारे ३२२.८४ कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनी ४७ लाख नवीन शेअर्स जारी करणार असून, १२ लाख शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जाणार आहेत.
2. Rajputana Stainless IPO
Rajputana Stainless कंपनीचा आयपीओ ९ मार्चपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना ११ मार्चपर्यंत या इश्यूमध्ये अर्ज करता येईल. कंपनीने या आयपीओसाठी प्रति शेअर ११६ ते ११२ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. कंपनी या इश्यूद्वारे सुमारे २५४.९८ कोटी रुपये बाजारातून उभारण्याचा प्रयत्न करत आहे. या अंतर्गत १.४७ कोटी नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत, तर ६३ लाख शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकले जाणार आहेत. एका लॉटमध्ये ११० शेअर्स असतील आणि किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १३,४२० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
3. Apsis Aerocom IPO
Apsis Aerocom कंपनीचा आयपीओ 11 मार्च ते 13 मार्च दरम्यान खुला राहणार आहे. या आयपीओचा एकूण आकार 35.77 कोटी रुपये आहे. कंपनी या इश्यूद्वारे ३३ लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे. कंपनीने प्रति शेअर १०४ ते ११० रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे.
4. Raajmarg Infra Investment Trust IPO
Raajmarg Infra Investment Trust कंपनी सुमारे ६,००० कोटी रुपये उभारण्यासाठी आयपीओ बाजारात आणत आहे. हा आयपीओ ११ मार्च ते १३ मार्च दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला राहणार आहे. या इश्यूमध्ये सर्व शेअर्स फ्रेश इश्यू स्वरूपात जारी केले जाणार आहेत. कंपनीने प्रति शेअर ९९ ते १०० रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. या आयपीओमध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) साठी जास्तीत जास्त ७५ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे, तर नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी किमान २५ टक्के हिस्सा राखीव असेल.
(विशेष सूचना- येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमींवर अवलंबून असते. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
