Unimech Aerospace IPO News : गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात आयपीओ आले आहेत. दरम्यान, आता २०२४ या वर्षाच्या अखेरिस आणखी आयपीओ येण्याच्या तयारीत आहेत. युनिमॅक्स एरोस्पेस या आणखी एका कंपनीचा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला झालाय. युनिमेक एरोस्पेसचा आयपीओ २३ डिसेंबर २०२४ रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झालाय आणि तो २६ डिसेंबरपर्यंत खुला राहील. आयपीओ सुरू होताच ग्रे मार्केटमधील कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. ग्रे मार्केटमध्ये युनिमॅक्स एअरोस्पेसचे शेअर्स ६० टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. कंपनीची एकूण इश्यू साइज ५०० कोटी रुपयांपर्यंत आहे. कंपनीचे शेअर्स एनएसई आणि बीएसईवर लिस्ट होतील.
१२६५ रुपयांवर लिस्ट होऊ शकतात शेअर्स
युनिमेक एरोस्पेसच्या आयपीओमधील (Unimech Aerospace IPO) शेअरची किंमत ७८५ रुपये आहे. तर ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स ४८० रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. सध्याच्या ग्रे मार्केट प्रीमियमचा विचार करता युनिमेक एअरोस्पेसचा (Unimech Aerospace Share Price) शेअर १,२६५ रुपयांवर लिस्ट होऊ शकतो. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये युनिमॅक्स एरोस्पेसचे शेअर्स अलॉट होती, त्यांना लिस्टिंगच्या दिवशी ६१ टक्क्यांहून अधिक परतावा मिळण्याची शक्यता आहे. युनिमॅक एअरोस्पेसचे शेअर्स ३१ डिसेंबर २०२४ रोजी बाजारात लिस्ट होतील. युनिमॅक एरोस्पेसच्या आयपीओमधील शेअर्सचं वाटप २७ डिसेंबर २०२४ रोजी अंतिम होईल.
एका लॉटमध्ये १९ शेअर्स
युनिमेक एअरोस्पेसच्या (Unimech Aerospace IPO) आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी एक लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोली लावता येणार आहे. आयपीओच्या एका लॉटमध्ये १९ शेअर्स आहेत. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना १ लॉटसाठी १४९१५ रुपये गुंतवावे लागतील. युनिमॅक एअरोस्पेस २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती. कंपनी मेकॅनिकल असेंब्ली, इलेक्ट्रो-मेकॅनिकल सिस्टम आणि एअरइंजिन आणि एअर-फ्रेम उत्पादनासाठी घटक तयार करते. आयपीओपूर्वी कंपनीत प्रवर्तकांचा ९१.८३ टक्के हिस्सा होता. युनिमॅक एरोस्पेसने अँकर बुक्सच्या माध्यमातून १४९.५ कोटी रुपये उभे केले आहेत.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)