Lokmat Money >शेअर बाजार > १ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?

१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Stock: एका मजबूत कंपनीमध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक तुम्हाला दीर्घकाळात श्रीमंत बनवू शकते. या कंपनीच्या शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 10:21 IST2025-09-06T10:21:41+5:302025-09-06T10:21:41+5:30

Multibagger Stock: एका मजबूत कंपनीमध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक तुम्हाला दीर्घकाळात श्रीमंत बनवू शकते. या कंपनीच्या शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

tvs motors multibagger stock Rs 1 lakh became Rs 1 crore this stock made me rich The company manufactures motorcycles and three wheelers do you have one | १ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?

१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Stock: एका मजबूत कंपनीमध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक तुम्हाला दीर्घकाळात श्रीमंत बनवू शकते. मोटारसायकली आणि तीन चाकी वाहनं बनवणाऱ्या टीव्हीएस मोटर कंपनीनं २० वर्षांत आपल्या शेअरहोल्डर्सना जबरदस्त परतावा दिला आहे. टीव्हीएस मोटर कंपनीनं २० वर्षांत १ लाख रुपयांची गुंतवणूक १ कोटी रुपयांपेक्षा जास्त केली आहे. बोनस शेअर्सच्या बळावर कंपनीच्या शेअर्सनी ही कामगिरी केलीये. ५ सप्टेंबर, शुक्रवारी टीव्हीएस मोटर कंपनीचे शेअर्स ३४७६.९५ रुपयांवर बंद झाले.

१ लाखाचे झाले १ कोटी

२ सप्टेंबर २००५ रोजी टीव्हीएस मोटर कंपनीचे शेअर्स ४१.२५ रुपयांवर होते. जर एखाद्या व्यक्तीनं २ सप्टेंबर २००५ रोजी टीव्हीएस मोटर कंपनीचे शेअर्स १ लाख रुपयांना खरेदी केले असते तर त्याला २४२४ शेअर्स मिळाले असते. टीव्हीएस मोटरनं सप्टेंबर २०१० मध्ये १:१ च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. म्हणजेच कंपनीने प्रत्येक शेअरवर १ बोनस शेअर दिला आहे. जर बोनस शेअर्स जोडले तर एकूण शेअर्सची संख्या ४,८४८ होते. ५ सप्टेंबर २०२५ रोजी बीएसईवर टीव्हीएस मोटर कंपनीचे शेअर्स ३४७६.९५ रुपयांवर बंद झाले. अशा परिस्थितीत, ४८४८ शेअर्सचे सध्याचे मूल्य १.६८ कोटी रुपये आहे. यामध्ये कंपनीनं दिलेला लाभांश समाविष्ट केलेला नाही. २००५ सालासाठी टीव्हीएस मोटर कंपनीची शेअर किंमत स्क्रीनरकडून घेतली आहे.

केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही

पाच वर्षांत ७००% पेक्षा जास्त वाढ

गेल्या पाच वर्षांत टीव्हीएस मोटर कंपनीचे शेअर्स ७००% पेक्षा जास्त वाढलेत. किंमतीच्या बाबतीत पाहिलं तर, पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्सच्या किमती ३०४३ रुपयांपेक्षा जास्त वाढल्यात. गेल्या १० वर्षांत या मोटारसायकल आणि तीन चाकी वाहन उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये १४५९ टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या दोन वर्षांत टीव्हीएस मोटर कंपनीचे शेअर्स १३८ टक्क्यांनी वाढलेत. टीव्हीएस मोटर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ३५४३.०५ रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २१७०.०५ रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: tvs motors multibagger stock Rs 1 lakh became Rs 1 crore this stock made me rich The company manufactures motorcycles and three wheelers do you have one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.