Lokmat Money >शेअर बाजार > Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?

Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?

Groww Zerodha News: जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ग्रो, झिरोधा, एंजल वन आणि अपस्टॉक्स सारख्या लोकप्रिय डिस्काऊंटेड ब्रोकर्सकडे तुम्ही तुमचं डीमॅट खातं उघडलं असण्याची शक्यता आहे. अशा ब्रोकर्ससाठी मार्च २०२५ महिन्यापासून अच्छे दिन कमी होताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:13 IST2025-06-17T11:10:51+5:302025-06-17T11:13:42+5:30

Groww Zerodha News: जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ग्रो, झिरोधा, एंजल वन आणि अपस्टॉक्स सारख्या लोकप्रिय डिस्काऊंटेड ब्रोकर्सकडे तुम्ही तुमचं डीमॅट खातं उघडलं असण्याची शक्यता आहे. अशा ब्रोकर्ससाठी मार्च २०२५ महिन्यापासून अच्छे दिन कमी होताना दिसत आहे.

top brokers including groww zerodha lost 4 7 lakh active customers in 2 months what is the reason | Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?

Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?

Groww Zerodha News: जर तुम्ही शेअर बाजारातगुंतवणूक करत असाल तर ग्रो, झिरोधा, एंजल वन आणि अपस्टॉक्स सारख्या लोकप्रिय डिस्काऊंटेड ब्रोकर्सकडे तुम्ही तुमचं डीमॅट खातं उघडलं असण्याची शक्यता आहे. अशा ब्रोकर्ससाठी मार्च २०२५ महिन्यापासून अच्छे दिन कमी होताना दिसत आहे. मनीकंट्रोलच्या एका आर्टिकलनुसार, ग्रो, झिरोधा, एंजल वन आणि अपस्टॉक्स यांनी एप्रिल ते मे या महिन्यांत मिळून एकूण ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक गमावले. यामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा झटका बसला आहे.

ग्रो, झिरोधा, एंजल वन आणि अपस्टॉक्सनं एप्रिल २०२५ मध्ये २.०५ लाख ग्राहक गमावले आणि मे महिन्यात २.७ लाख ग्राहक गमावले. मे महिन्याच्या शेवटच्या बिझनेस आठवड्यात यामध्ये वाढ झाली आणि त्यामुळे हा आकडा ४.६९ कोटींच्या पुढे गेलाय. ग्रो नं मे २०२५ मध्ये केवळ २,००० ग्राहक गमावले आणि ग्राहकांची संख्या १.२८ कोटींवर पोहोचली. सर्वात मोठा झटका झिरोदाला बसलाय ज्यानं मे महिन्यात ७६ हजार ग्राहक गमावलेत. मे महिन्यात एंजेल वननं ५४,००० आणि अपस्टॉक्सनं ४६,९७८ ग्राहक गमावले.

ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 

जेव्हा अनेक कंपन्या आपले ग्राहक गमावत होते तेव्हा आयसीआयसीआय सिक्युरिटीज ही एकमेव मोठी ब्रोकरेज कंपनी होती ज्यानं मे महिन्यात ३,१५८ नवीन ग्राहक जोडलेत, ज्यामुळे एकूण ग्राहकांची संख्या १९.५० लाख झाली आहे.

का कमी होतेय संख्या?

ब्रोकरेज उद्योगावर बारकाईनं लक्ष ठेवणाऱ्या बाजार तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, ब्रोकरच्या क्लायंटमध्ये होत असलेली घसरम ही एक कुल ऑफ फेज आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की मोठ्या तेजीनंतर थोडी स्थिरता किंवा घसरणीचा कल दिसून जो सध्याच्या काळात ब्रोकर्ससोबत दिसून येतोय. सध्या बाजारात मंदीसारखं वातावरण आहे, याशिवाय गुंतवणूकदार खूप सावधगिरीनं गुंतवणूक करत आहेत, तर दुसरीकडे फ्युचर्स अँड ऑप्शन ट्रेडिंग सेगमेंटमध्ये अनेक नवे नियम लागू करण्यात आलेत, ज्याचा परिणाम ग्राहकांवर दिसून येत आहे, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र, जून महिन्यात सर्वच नव्या कंपन्यांचे आयपीओ वेगानं येणार असल्यानं ग्राहकांची संख्या पुन्हा वाढण्यास मदत होऊ शकते, असं बाजार तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: top brokers including groww zerodha lost 4 7 lakh active customers in 2 months what is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.