Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > टाटा पॉवर ते SBI पर्यंत, 'या' ५ शेअर्समध्ये दडलाय मोठा परतावा, ब्रोकरने दिली टार्गेट प्राईस

टाटा पॉवर ते SBI पर्यंत, 'या' ५ शेअर्समध्ये दडलाय मोठा परतावा, ब्रोकरने दिली टार्गेट प्राईस

Top 5 Stock : इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. मात्र, यातच मोठी संधी दडल्याचेही ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:29 IST2026-03-17T10:49:09+5:302026-03-17T11:29:03+5:30

Top 5 Stock : इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. मात्र, यातच मोठी संधी दडल्याचेही ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे.

Top 5 Stock Recommendations by Motilal Oswal March 2026: SBI, Tata Power, TVS Motor Targets | टाटा पॉवर ते SBI पर्यंत, 'या' ५ शेअर्समध्ये दडलाय मोठा परतावा, ब्रोकरने दिली टार्गेट प्राईस

टाटा पॉवर ते SBI पर्यंत, 'या' ५ शेअर्समध्ये दडलाय मोठा परतावा, ब्रोकरने दिली टार्गेट प्राईस

Top 5 Stock : शेअर बाजारातील सध्याच्या अस्थिरतेच्या वातावरणात, दिग्गज ब्रोकरेज फर्म 'मोतीलाल ओसवाल वेल्थ मॅनेजमेंट'ने पाच दमदार शेअर्सची निवड केली आहे. पायाभूत सुविधा, बँकिंग, ऑटो आणि ऊर्जा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांतील हे शेअर्स आगामी काळात गुंतवणूकदारांची चांदी करू शकतात. या कंपन्यांची भक्कम आर्थिक स्थिती आणि भविष्यातील विस्तार योजना पाहता, मोठी वाढ अपेक्षित आहे.


१. कमिन्स इंडिया
उद्दिष्ट (TP): ५,५०० रुपये
पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातून जनरेटर सेटसाठी मोठी मागणी आहे. विशेषतः डेटा सेंटर्स, हॉटेल्स आणि रुग्णालयांमधून हाय-हॉर्सपॉवर उत्पादनांना मागणी वाढत आहे. कंपनीचे मार्जिन २१ टक्क्यांच्या वर राहण्याचा अंदाज असून, निर्यातीतही चांगली वाढ अपेक्षित आहे.

२. स्टेट बँक ऑफ इंडिया
उद्दिष्ट (TP): १,३०० रुपये
देशातील सर्वात मोठ्या बँकेने गेल्या २० वर्षांतील सर्वात कमी NPA (Gross NPA १.५७%) नोंदवून आपली ताकद सिद्ध केली आहे. बँकेचे ताळेबंद खाजगी बँकांपेक्षाही स्वच्छ दिसत आहेत. कर्जाच्या मागणीत १४-१५% वाढ अपेक्षित असून, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील कॉर्पोरेट कर्जांचा ओघ वाढला आहे.

३. टीव्हीएस मोटर
उद्दिष्ट (TP): ४,४६१ रुपये
शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही बाजारांत टीव्हीएसची पकड मजबूत आहे. कंपनीचा ईव्ही व्यवसाय आता नफ्यात आला आहे. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील निर्यातीमुळे कंपनीच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. आगामी काळात कंपनीचा नफा २९% दराने वाढण्याचा अंदाज आहे.

४. जैन रिसोर्स रिसायकलिंग
उद्दिष्ट (TP): ५२० रुपये
ही भारतातील सर्वात मोठी नॉन-फेरस मेटल रिसायकलिंग कंपनी आहे. तांबे आणि शिसे रिसायकलिंगमध्ये कंपनीचा दबदबा असून १२८ देशांतून भंगार आयात करण्याचे त्यांचे जागतिक जाळे आहे. क्षमता विस्तारामुळे आगामी काळात नफ्यात ५६% ची मोठी वाढ अपेक्षित आहे.

५. टाटा पॉवर
उद्दिष्ट (TP): ४५५ रुपये
वाढत्या उष्णतेमुळे आणि औद्योगिक मागणीमुळे विजेचा वापर विक्रमी पातळीवर आहे. ओडिशामधील वितरण कंपन्या नफ्यात आल्या असून, मुंद्रा प्रकल्पाबाबतचा करार अंतिम टप्प्यात आहे. कंपनीकडे ५.२ GW क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प पाइपलाइनमध्ये असून, छतावरील सौर क्षेत्रात कंपनी आघाडीवर आहे.

कंपनीचे नावब्रोकरेजचे उद्दिष्टमुख्य आकर्षण
कमिन्स इंडिया५,५००डेटा सेंटर आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढ
SBI १,३००२० वर्षांतील निच्चांकी NPA
टीव्हीएस मोटर४,४६१ईव्ही आणि निर्यात क्षेत्रातील यश
जैन रिसोर्स५२० रिसायकलिंग क्षेत्रातील वाढ
टाटा पॉवर४५५ अपारंपरिक ऊर्जा आणि मुंद्रा प्रकल्प

 

वाचा - गॅस ग्राहकांनो सावधान! केंद्राचे पाच मोठे निर्णय; आता सिलिंडर बुकिंगसाठी मोजावे लागणार ४५ दिवस

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : उच्च रिटर्न क्षमता वाले शीर्ष 5 स्टॉक: ब्रोकरेज लक्ष्य

Web Summary : मोतीलाल ओसवाल वेल्थ मैनेजमेंट ने इंफ्रास्ट्रक्चर, बैंकिंग, ऑटो और ऊर्जा क्षेत्रों में पांच मजबूत स्टॉक की सिफारिश की है। कमिंस इंडिया, एसबीआई, टीवीएस मोटर, जैन रिसोर्स रिसाइक्लिंग और टाटा पावर मजबूत वित्तीय स्थिति और विकास की संभावनाओं को दर्शाते हैं, जो निवेशकों के लिए अच्छा रिटर्न का वादा करते हैं।

Web Title : Top 5 Stocks with High Return Potential: Brokerage Targets

Web Summary : Motilal Oswal Wealth Management recommends five robust stocks across infrastructure, banking, auto, and energy sectors. Cummins India, SBI, TVS Motor, Jain Resource Recycling, and Tata Power show strong financial positions and growth prospects, promising good returns for investors.