Top 5 Stock Picks : सरकारने जीएसटीत सुधारणा केल्यानंतर बाजारात पुन्हा एकदा उत्साह पाहायला मिळत आहे. देशातील अर्थव्यवस्थेत सुधारणा, वाढता खर्च करण्याची क्षमता आणि सणासुदीच्या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने गुंतवणूकदारांसाठी पाच दमदार समभाग निवडले आहेत. आयटी, अक्षय ऊर्जा, विमा आणि वाहन क्षेत्रातील हे समभाग मजबूत वाढ दाखवण्यास सज्ज आहेत.
१. स्विगी (लक्ष्य किंमत: ₹५६०)
ई-कॉमर्स क्षेत्रातील स्पर्धा कमी झाल्यामुळे स्विगीला मोठा फायदा होत आहे. कंपनीचे युनिट इकोनॉमिक्स सुधारत असून, इन्स्टामार्ट त्वरित नफा मिळवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. फूड डिलिव्हरी क्षेत्राचा विकास दर आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये २१-२३% राहण्याचा अंदाज आहे. लवकरच 'क्विक कॉमर्स' उपकंपनी नफ्यात येण्याची शक्यता असल्यामुळे ₹५६० च्या लक्ष्य किंमतीसाठी हा समभाग खरेदी करण्याची शिफारस आहे.
२. Acme Solar (लक्ष्य किंमत: ₹३७०)
अक्षय ऊर्जा क्षेत्रात ACME ने उत्कृष्ट प्रकल्प वितरण क्षमता दर्शविली आहे. कंपनी आपली क्षमता आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत २.५ GW वरून ५.५ GW पर्यंत वाढवण्याचे लक्ष ठेवून आहे. आर्थिक वर्ष २०२५ ते २०२८ दरम्यान EBITDA मध्ये ७४% CAGR अपेक्षित आहे. दीर्घकालीन वीज खरेदी करार आणि सरकारी पाठबळामुळे ही कंपनी मजबूत स्थितीत आहे. ३७० रुपयांच्या लक्ष्य किंमतीसाठी ACME आमच्यासाठी टॉप पिक आहे.
३. Max Financial (लक्ष्य किंमत: ₹२०००)
मॅक्स फायनान्शियल विमा उद्योगाच्या सरासरीपेक्षा जास्त वेगाने वाढण्यास सज्ज आहे. मजबूत बँकएश्युरन्स आणि एजन्सी चॅनेलमुळे कंपनीचा व्यवसाय मजबूत आहे. तिमाही निकालानुसार, कंपनीच्या VNB (Value of New Business) मार्जिनमध्ये २०.१% पर्यंत वाढ झाली आहे, जी स्पर्धकांमध्ये सर्वाधिक आहे. GST माफीमुळे विम्याची परवड क्षमता वाढेल आणि कंपनीचा APE/VNB CAGR आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत १८%/२१% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
४. KEI Industries (लक्ष्य किंमत: ₹४७००)
KEI इंडस्ट्रीजने १७ अब्ज रुपये खर्चून सानंद येथील नवीन ग्रीनफिल्ड सुविधेसह मोठा विस्तार सुरू केला आहे, ज्यामुळे २०२७ पर्यंत उत्पादन क्षमता वाढेल. कंपनीने B2C (ग्राहक) महसुलातील वाटा २९% वरून ५२% पर्यंत वाढवला आहे. पायाभूत सुविधा, पॉवर सेक्टर, ईव्ही (EV) आणि डेटा सेंटर्समधील वाढत्या मागणीमुळे कंपनीला मोठा फायदा होणार आहे. आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत महसूल आणि PAT मध्ये अनुक्रमे १८% आणि २१% CAGR अपेक्षित आहे.
५. Hero Motocorp (लक्ष्य किंमत: ₹६१६८)
हिरो मोटोकॉर्पने उत्सवाच्या हंगामात जोरदार सुरुवात केली आहे आणि विक्रमी विक्रीची अपेक्षा आहे. कंपनीच्या ९५% उत्पादन पोर्टफोलिओला GST दर कपातीचा फायदा मिळणार आहे, ज्यामुळे विक्री वाढेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होत असल्याने Hero Motocorp ला मोठा फायदा होईल. आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत महसूल/EBITDA/PAT मध्ये अनुक्रमे ७%/८%/९% CAGR अपेक्षित आहे. ६,१६८ रुपयांच्या लक्ष्य किंमतीसाठी हा स्टॉक खरेदी करावा.
समभाग | वर्तमान बाजार भाव (CMP - रुपये) | लक्ष्य किंमत (Target Price - रुपये) | अपेक्षित वाढ |
स्विगी | ४२२ | ५६० | ३३% |
एसीएमई सोलर | २८८ | ३७० | २८% |
मॅक्स फायनान्स | १६०० | २००० | २५% |
केईआय इंडस्ट्रीज | ४१४१ | ४७०० | १३% |
हिरो मोटकॉर्प | ५५८३ | ६१६८ | १०% |
वाचा - EPFO देतोय २१,००० जिंकण्याची संधी! प्रवेशिका दाखल करण्याची शेवटची तारीख आली जवळ, कसा करायचा अर्ज?
(टीप: वरील शिफारसी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस रिसर्च डेस्कने दिलेल्या आहेत. शेअर बाजारातीलगुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)