Lokmat Money >शेअर बाजार > ३५ रुपयांवरून ₹१४०० पार गेला 'हा' छोटा शेअर, वर्षभरात ३८००% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?

३५ रुपयांवरून ₹१४०० पार गेला 'हा' छोटा शेअर, वर्षभरात ३८००% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?

Trident Techlabs Stock Price: या छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये वर्षभरापासून जोरदार तेजी आहे. या काळात कंपनीचे शेअर्स ३५ रुपयांवरून १४०० रुपयांपर्यंत वधारले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:47 IST2025-01-17T13:47:01+5:302025-01-17T13:47:01+5:30

Trident Techlabs Stock Price: या छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये वर्षभरापासून जोरदार तेजी आहे. या काळात कंपनीचे शेअर्स ३५ रुपयांवरून १४०० रुपयांपर्यंत वधारले आहेत.

This small share went from Rs 35 to Rs 1400 up 3800% in a year; Do you own it? | ३५ रुपयांवरून ₹१४०० पार गेला 'हा' छोटा शेअर, वर्षभरात ३८००% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?

३५ रुपयांवरून ₹१४०० पार गेला 'हा' छोटा शेअर, वर्षभरात ३८००% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?

Trident Techlabs Stock Price: ट्रायडंट टेकलॅब्स या छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये वर्षभरापासून जोरदार तेजी आहे. या काळात कंपनीचे शेअर्स ३५ रुपयांवरून १४०० रुपयांपर्यंत वधारले आहेत. ट्रायडेंट टेकलॅब्सचा शेअर शुक्रवारी १४५० रुपयांवर व्यवहार करत आहे. कंपनीच्या समभागांनी वर्षभरात गुंतवणूकदारांना ३८०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ट्रायडंट टेकलॅब्सच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १६७० रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १५७.१० रुपये आहे.

१४०० रुपयांच्या पुढे शेअर

ट्रायडंट टेकलॅब्सचा आयपीओ २१ डिसेंबर २०२३ रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला आणि २६ डिसेंबर २०२३ पर्यंत खुला राहिला. कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत ३५ रुपये होती. ट्रायडेंट टेकलॅब्सचा शेअर २९ डिसेंबर २०२३ रोजी ९८.१५ रुपयांवर लिस्ट झाला होता. १७ जानेवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर १४५० रुपयांवर पोहोचला. ट्रायडेंट टेकलॅब्सच्या शेअर्सनं ३५ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत ३८०० टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे.

७६३ पट झालेला सबस्क्राइब

ट्रायडंट टेकलॅब्सचा आयपीओ एकूण ७६३.३ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा १०५९.४३ पट सब्सक्राइब झाला होता. तर नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) कॅटेगरीमध्ये ८५४.३७ पट सब्स्क्रिप्शन मिळालं होतं. ट्रायडंट टेकलॅब्सच्या आयपीओमध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा (QIB) कोटा ११७.९१ पट सब्सक्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना केवळ १ लॉटसाठी बोली लावता आला. आयपीओच्या एका लॉटमध्ये ४००० शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी १,४०,००० रुपये गुंतवावे लागले असते.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: This small share went from Rs 35 to Rs 1400 up 3800% in a year; Do you own it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.