शेअर बाजारात अस्थिरता दिसत असतानाही, ट्रान्सफॉर्मर अँड रेक्टिफायर इंडिया (TRIL) च्या शेअर्सने जबरदस्त पुनरागमन केले आहे. या शेअरमध्ये सोमवारी सुमारे ११.३% ची तेजी दिसून आली आणि तो दिवसाच्या उच्चांकी पातळीवर ₹३११.८५ पर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे, अवघ्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्येच या शेअरने जवळपास ३०% ची वाढ नोंदवली आहे.
हा शेअर १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत ४०% पर्यंत घसरला होता आणि १८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. यामुळे गुंतवणूकदार निराश झाले होते. मात्र, सध्याची वाढ गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा आहे.
यापूर्वीच्या घसरणीमागे सप्टेंबर तिमाहीचे कमकुवत निकाल होते. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर २४% ने घसरून केवळ ₹ ३४ कोटी राहिला, जो गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत ₹45 कोटी होता. मात्र, कंपनीचा महसूल ₹ ४६० कोटींवर स्थिर राहिला. खर्चात वाढ झाल्यामुळे EBITDA २७% नी कमी होऊन ₹ ५१.३ कोटी झाला, तर मार्जिन ११.१५% पर्यंत घसरला.
महत्वाचे म्हणजे, नुकत्याच झालेल्या सुधारणेनंतरही, शेअर अलिकडील आपल्या उच्चांकाच्या तुलनेत अद्यापही ४८% ने खालीच आहे. मात्र तरीही, दीर्घकाळात या शेअरची कामगिरी खूपच प्रभावी राहिली आहे. या शेअरने गेल्या ३ वर्षांत ९२६% तर ५ वर्षांत सुमारे ६,५००% चा जबरदस्त परतावा दिला आहे आणि आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
टीआरआयएल (TRIL) ऊर्जा, रेल्वे, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि पायाभूत सुविधा (Infrastructure) यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
