Delhivery share price: लॉजिस्टिक्स क्षेत्राशी संबंधित डेल्हीवेरी लिमिटेड या कंपनीबाबत एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. या सकारात्मक बातमीमुळे गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीसाठी उड्या घेतल्या. आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी हा शेअर ३ टक्क्यांहून अधिक वधारून ३३५ रुपयांवर पोहोचला. १५ जानेवारी रोजी हा शेअर ३१८.०५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे. तर, शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४८८.०५ रुपये आहे. कंपनीच्या शेअरनं फेब्रुवारी २०२४ मध्ये ही पातळी गाठली होती.
काय आहे सकारात्मक बातमी?
डेल्हीवेरी लिमिटेडनं रॅपिड कॉमर्स लाँच केल्यानंतर गुरुवारी कंपनीच्या शेअरच्या किंमतीत वाढ झाली. ग्राहकांकडून फास्ट ऑर्डर डिलिव्हरीची वाढती मागणी पूर्ण करणाऱ्या ब्रँडसाठी कंपनीनं २ तासांपेक्षा कमी डिलिव्हरी सेवा देण्याची घोषणा केली आहे. बंगळुरूमध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आलेल्या या सेवेनं दररोज ३०० हून अधिक ऑर्डरवर प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या काही महिन्यांत हैदराबाद, चेन्नई, एनसीआर, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद सह इतर मेट्रो शहरांमध्ये ही सेवा विस्तारण्याची कंपनीची योजना आहे.
कंपनीचे तिमाही निकाल
३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत डेल्हीवेरीला १०.२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचा महसूल गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत १३ टक्क्यांनी वाढून २,१८९.७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीनं डिसेंबर तिमाहीचं निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीत.
डेल्हीवेरीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचं झाले तर १०० टक्के हिस्सा सार्वजनिक भागधारकांकडे आहे. याचा अर्थ प्रवर्तकांचा एक टक्काही हिस्सा नाही. त्याच्या सार्वजनिक भागधारकांमध्ये अनेक म्युच्युअल फंडांचाही समावेश आहे. यामध्ये एसबीआय इक्विटी हायब्रीड फंड, एचडीएफसी म्युच्युअल फंड आणि एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड यांचा समावेश आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूकर करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)