Mukesh ambani penny stocks: मुकेश अंबानी यांच्या अनेक कंपन्या अशा आहेत ज्या शेअर बाजारात लिस्ट झाल्या आहेत. अशा तीन कंपन्या आहेत ज्यांच्या शेअरची किंमत ४० रुपयांपेक्षा कमी आहे. या तीन कंपन्या म्हणजे आलोक इंडस्ट्रीज, डेन नेटवर्क्स आणि हॅथवे केबल अँड डेटाकॉम लिमिटेड. या कंपन्यांच्या शेअर्सची नाममात्र किंमत असून शुक्रवारी तिन्ही शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.
शेअरची किंमत
हॅथवे केबल अँड डेटाकॉम लिमिटेडच्या शेअरबद्दल बोलायचं झालं तर शुक्रवारी त्याची किंमत २ टक्क्यांनी वाढून १३.९० रुपये झाली. ४ मार्च २०२५ रोजी शेअरचा भाव १२.१२ रुपये होता. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तरही आहे. जुलै २०२४ मध्ये हा शेअर २५.६६ रुपयांवर पोहोचला होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.
आलोक इंडस्ट्रीजच्या शेअरबद्दल बोलायचं झालं तर त्याची किंमत १६.७५ रुपये होती. ३ मार्च २०२५ रोजी हा शेअर १४.५० रुपयांवर होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे. एप्रिल २०२४ मध्ये हा शेअर ३० रुपयांवर होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.
तर दुसरीकडे डेन नेटवर्क्सच्या शेअरबद्दल बोलायचं झालं तर तो ३३.१६ रुपयांवर होता. १८ मार्च २०२५ रोजी हा शेअर २९.७० रुपयांवर होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे. जुलै २०२४ रोजी हा शेअर ५८.९० रुपयांवर होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.
कोणत्या कंपनीचा हिस्सा किती?
डेन नेटवर्क्स, हॅथवे केबल अँड डेटाकॉम लिमिटेड आणि आलोक इंडस्ट्रीजमध्ये प्रवर्तकांची अनुक्रमे ७४.९० टक्के, ७५ टक्के आणि ७५ टक्के भागीदारी आहे. आलोक इंडस्ट्रीजमधील प्रवर्तकाच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचं झाले तर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जेएम फायनान्शियल असेट रिकन्स्ट्रक्शन यांचा संयुक्त हिस्सा आहे. यात रिलायन्सचा ४०.०१ टक्के आणि जेएम फायनान्शियल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचा ३४.९९ टक्के हिस्सा आहे.
हॅथवे केबल आणि डेटाकॉम लिमिटेडबद्दल बोलायचं झाल्यास प्रवर्तकांमध्ये जिओ कंटेंट डिस्ट्रीब्यूशन होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड, जिओ इंटरनेट डिस्ट्रिब्युशन होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जिओ केबल अँड ब्रॉडबँड होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. डेन नेटवर्क्सच्या बाबतीत, प्रवर्तकांची जिओ टेलिव्हिजन डिस्ट्रिब्युशन होल्डिंगमध्ये सुमारे १६ टक्के हिस्सा आहे. याशिवाय जिओ डिजिटल डिस्ट्रिब्युशन होल्डिंगमध्ये १५ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)