Meesho IPO Details: ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी मीशो (Meesho) आयपीओ (IPO) मार्केटमध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे. जर सर्व काही ठीक राहिलं, तर डिसेंबर महिन्यात कंपनीचा आयपीओ येऊ शकतो. उद्योग जगतातील एका सूत्रानं मनीकंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार, रोड शो आणि गुंतवणूकदारांशी चर्चा झाल्यानंतर मीशोनं आता आपलं मूल्यांकन निश्चित केलं आहे आणि लवकरच लिस्टिंगसाठी तयार आहे.
दुसऱ्या एका सूत्रानं सांगितले की, मीशो डिसेंबरच्या सुरुवातीला आपला आयपीओ लॉन्च करण्याची योजना आखत आहे. कंपनीने जुलैमध्ये गोपनीय पद्धतीनं सेबीकडे (SEBI) ड्राफ्ट पेपर्स दाखल केले होते, त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी यूडीआरएचपी-१ (अपडेट ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) दाखल केला गेला. यूडीआरएचपी-२ लवकरच दाखल केला जाईल.
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
आयपीओचे तपशील काय आहेत?
मीशोनं या आयपीओमधून ४,२५० कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. प्रस्तावित आयपीओमध्ये ₹ ४,२५० कोटी पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि काही विद्यमान भागधारकांकडून १७,५६,९६,६०२ इक्विटी शेअर्सचा ओएफएस (OFS) समाविष्ट आहे. विक्रीच्या प्रस्तावात मीशोच्या काही सुरुवातीच्या गुंतवणूकदारांद्वारे इक्विटी शेअर्सची विक्री समाविष्ट आहे, ज्यात एलिवेशन, पीक एक्सव्ही, व्हेंचर हायवे आणि वाय कॉम्बिनेटर यांचा समावेश आहे. विद्यमान गुंतवणूकदार त्यांच्या भागभांडवलापैकी अंदाजे पाच ते सात टक्के विक्री करण्याचा विचार करत आहेत. कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंग, जेपी मॉर्गन, ॲक्सिस कॅपिटल, सिटी आणि मॉर्गन स्टॅनली हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.
आयपीओच्या पैशांचा कुठे वापर होणार?
आयपीओमधून जमा होणारी रक्कम मीशोची उपकंपनी मीशो टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरसाठी गुंतवणूक करण्यासाठी वापरली जाईल. एमटीपीएलद्वारे केले जात असलेल्या एआय (AI) आणि तंत्रज्ञान विकासासाठी मशीन लर्निंग, एआय आणि तंत्रज्ञान टीम्ससाठी असलेल्या सध्याच्या आणि नवीन नियुक्त्यांच्या पगारासाठी हे पैसे वापरले जातील. याशिवाय, मार्केटिंग आणि ब्रँड उपक्रमांवरील खर्चासाठी एमटीपीएलमध्ये गुंतवणूक केली जाईल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
