Lokmat Money >शेअर बाजार > Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट

Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट

Infosys Share Buyback: इन्फोसिसच्या शेअर्समध्ये बायबॅकच्या घोषणेचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. कंपनी आपले शेअर्स बायबॅक करणारे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 10:11 IST2025-09-12T10:10:48+5:302025-09-12T10:11:07+5:30

Infosys Share Buyback: इन्फोसिसच्या शेअर्समध्ये बायबॅकच्या घोषणेचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. कंपनी आपले शेअर्स बायबॅक करणारे.

tech company Infosys stock buyback again Will buy its own shares at 19 percent premium stock high | Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट

Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट

Infosys Buyback: इन्फोसिसच्या शेअर्समध्ये बायबॅकच्या घोषणेचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. कंपनीचे शेअर्स २.३२ टक्क्यांच्या वाढीसह १५४४.६५ रुपयांवर उघडले. इन्फोसिस (Infosys Share price) १० कोटी शेअर्स बायबॅक करणार आहे. बायबॅकवरून असं दिसून येते की कंपनीला लाँग टर्म कॅश फ्लो आणि वाढीबद्दल आत्मविश्वासू आहे. गेल्या एका वर्षात इन्फोसिसचे शेअर्स १९ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. त्याच वेळी, कंपनी दोन वर्षांत ४.६३ टक्के आणि ३ वर्षांत फक्त २.१७ टक्के परतावा देऊ शकली आहे. जे सेन्सेक्स निर्देशांकापेक्षा खूपच कमी आहे.

इतिहासातील सर्वात मोठं बायबॅक

देशातील आघाडीची कंपनी इन्फोसिस लिमिटेडनं बायबॅकची घोषणा केली आहे. कंपनीनं १८००० कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करण्याचा निर्णय घेतलाय. ही प्रक्रिया निविदा मार्गानं केली जाईल. इन्फोसिस लिमिटेड बायबॅकद्वारे १० कोटी शेअर्स खरेदी करेल. जे कंपनीच्या हिस्स्याच्या २.४१ टक्के आहे. इन्फोसिस लिमिटेडनं गुरुवारी या बायबॅकसाठी प्रति शेअर १८०० रुपये किंमत जाहीर केली आहे. जी गुरुवारच्या बंदपेक्षा १९ टक्क्यांनी जास्त आहे.

शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात, निफ्टी ७० अंकांनी वधारला; सेन्सेक्सची डबल सेन्चुरी, IT Stocks मध्ये खरेदी

बायबॅक म्हणजे काय?

कंपनीच्या भागधारकांना त्यांचे शेअर्स बाजारभावापेक्षा जास्त किमतीत कंपनीला विकण्याची संधी असते. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. बायबॅकसाठी एक रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. ज्या गुंतवणूकदारांकडे त्या दिवशी शेअर्स असतील तेच त्यांचे शेअर्स कंपनीला विकू शकतील.

पाचव्यांदा बायबॅकची घोषणा

ही आयटी कंपनी पाचव्यांदा त्यांचे शेअर्स बायबॅक करणार आहे. २०१७ मध्ये कंपनीने १३००० कोटी रुपयांचा बायबॅक केला होता. इन्फोसिसने २०१९ मध्ये ८२६० कोटी रुपये आणि २०२१ मध्ये ९२०० कोटी रुपये किमतीचे शेअर्स बायबॅक केले होते. कंपनीनं शेवटचे ९३०० कोटी रुपयांचे शेअर्स २०२३ मध्ये परत खरेदी केले होते.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: tech company Infosys stock buyback again Will buy its own shares at 19 percent premium stock high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.