TATA Titan Stock Price: बुधवारी सकाळी टाटा ग्रुप कंपनी टायटननं आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी एक मजबूत व्यवसाय अपडेट जारी केल्यानंतर, टाटा ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये ४% पेक्षा जास्त वाढ झाली. टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअरची किंमत बीएसईवर ४.४०% वाढून ₹३,५६७.०० प्रति शेअर झाली. जुलै ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत टायटनचा ग्राहक व्यवसाय वार्षिक आधारावर २०% नं वाढला. या कालावधीत कंपनीनं ५५ नवीन स्टोअर्स (नेट) जोडली, ज्यामुळे टायटनचं एकूण रिटेल नेटवर्क ३,३७७ स्टोअर्सवर पोहोचलं.
दागिने, घड्याळं आणि आयकेअरची कामगिरी
कंपनीच्या देशांतर्गत दागिन्यांच्या व्यवसायात वार्षिक आधारावर १९% ची वाढ झाली. अॅनालॉग विभागात १७% वाढ झाल्यानं देशांतर्गत घड्याळ व्यवसायात १२% वाढ झाली. आंतरराष्ट्रीय ब्रँड, सनग्लासेस आणि ई-कॉमर्स चॅनेलच्या मजबूत विक्रीमुळे देशांतर्गत आयकेअर व्यवसाया ९% वाढ झाली. उद्योन्मुख व्यवसायांमध्ये, फ्रॅग्रन्सची देशांतर्गत विक्री ४८% नी वाढली, ज्यामध्ये फास्टट्रॅक (Fastrack) आणि स्किन (Skinn) ब्रँड्सच्या मजबूत मागणीचा मोठा वाटा आहे. महिलांच्या बॅगच्या विक्रीत ९०% नी वाढ झाली, जी स्टोअर नेटवर्कच्या विस्तारामुळे शक्य झाली. तनिरा (Taneira) ब्रँडनं १३% वाढ नोंदवली.
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
ब्रोकरेज हाऊसचं म्हणणं काय?
अँटीक स्टॉक ब्रोकिंगचे मत आहे की, सोन्याच्या किमतीतील वाढीमुळे दुसऱ्या तिमाहीत टायटनच्या ग्रॉस मार्जिनवर दबाव राहू शकतो. दरम्यान, स्टडेड ज्वेलरीच्या स्थिर वाढीमुळे हा परिणाम काही प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. घड्याळांच्या व्यवसायाची वाढती प्रॉफिटेबलिटीदेखील मार्जिनमध्ये दिलासा देऊ शकते.
ब्रोकरेज हाऊसला अपेक्षा आहे की, पुढील तीन वर्षांमध्ये दागिन्यांच्या व्यवसायाच्या उत्पन्नात सीएजीआर १९% राहील. दागिन्यांचे EBIT मार्जिन, जे आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ९.७% होते, ते पुढील तीन वर्षांमध्ये वाढून ११.८% पर्यंत पोहोचू शकते. टायटनचा दीर्घकालीन परफॉर्मन्स मजबूत ब्रँड नाव, उत्कृष्ट अंमलबजावणी आणि स्टोअर नेटवर्क विस्तारामुळे दागिन्यांच्या व्यवसायात बाजार हिस्सा वाढल्यामुळे पुढे जाईल, असं त्यांचं मत आहे. यासोबतच इतर विभागांच्या प्रॉफिटेबलिटीमध्ये सुधारणा होणंदेखील कंपनीसाठी सकारात्मक घटक आहे.
टार्गेट प्राईस किती?
अँटीक स्टॉक ब्रोकिंगनं टायटनच्या शेअरवर ₹४,६१५ ची टार्गेट प्राईज (Target Price) निश्चित करून 'खरेदी'ची (Buy) शिफारस कायम ठेवली आहे. गेल्या एका महिन्यात टायटनच्या शेअर्समध्ये ३% ची घसरण झाली आहे, तर गेल्या सहा महिन्यांत तो १४% नी वाढला आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत त्यात १०% ची वाढ झाली आहे आणि गेल्या दोन वर्षांत तो फक्त ७.५% नी वाढला आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत टायटनच्या शेअरनं १८५% चा शानदार परतावा दिला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)