Lokmat Money >शेअर बाजार > Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

Tata Motors Ltd Share Price: तिमाही निकाल आणि लाभांश जाहीर होण्यापूर्वी टाटा मोटर्सनं मोठा निर्णय घेतला. पाहा काय घेतलाय कंपनीनं निर्णय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:48 IST2025-05-03T15:47:44+5:302025-05-03T15:48:47+5:30

Tata Motors Ltd Share Price: तिमाही निकाल आणि लाभांश जाहीर होण्यापूर्वी टाटा मोटर्सनं मोठा निर्णय घेतला. पाहा काय घेतलाय कंपनीनं निर्णय.

Tata Motors takes big decision before Q4 results and dividend The matter is worth Rs 500 crore | Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

Tata Motors Ltd Share Price: तिमाही निकाल आणि लाभांश जाहीर होण्यापूर्वी टाटा मोटर्सनं मोठा निर्णय घेतलाय. कंपनीच्या संचालक मंडळानं शुक्रवारी, २ मे रोजी ५०० कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्सच्या संचालक मंडळानं एनसीडीला मंजुरी दिली. कंपनी हा निधी दोन टप्प्यात वार्षिक ७.०८ टक्के दरानं उभारणार आहे. टाटा मोटर्सच्या या निर्णयाचा परिणाम सोमवारी कंपनीच्या शेअर्सवर होऊ शकतो.

एनसीडीचा पहिला टप्पा ११ मे २०२८ रोजी आणि दुसरा टप्पा १२ मे २०२८ रोजी मॅच्युअर होईल. एनसीडीच्या दोन्ही हिस्स्यांचं अलॉटमेंट १३ मे २०२५ रोजी होईल. हा निश्चित उत्पन्नाचा स्त्रोत आहे. कंपन्या एनसीडीच्या माध्यमातून निधी गोळा करतात. मॅच्युरिटीनंतर एनसीडीचे शेअर्समध्ये रूपांतर करता येत नाही. कंपन्या ठराविक कालावधीसाठी एनसीडी आणतात.

'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?

टाटा मोटर्सनं तिमाही निकाल आणि लाभांश जाहीर होणार असताना एनसीडीचा हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक १४ मे रोजी आहे. तिमाही निकाल आणि लाभांश यावर निर्णय घेणं हा या बैठकीचा अजेंडा आहे.

शुक्रवारी कशी होती शेअर्सची स्थिती?

टाटा मोटर्सचा शेअर शुक्रवारी बीएसईवर १.२० टक्क्यांनी वधारून ६५१.८५ रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षभरात टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत ३६ टक्क्यांनी घसरली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ११७९.०५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५४२.५५ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप २,३९,९६८ कोटी रुपये आहे. तिसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्सचा निव्वळ नफा ५४५१ कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात २२.५० टक्क्यांची घट झाली होती. गुंतवणूकदारांचं लक्ष आता कंपनीच्या तिमाही निकालाकडे असणार आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Tata Motors takes big decision before Q4 results and dividend The matter is worth Rs 500 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.