Lokmat Money >शेअर बाजार > ६ महिन्यांमध्ये ३७% ची घसरण, आता ९३० रुपयांपर्यंत जाऊ शकतात Tata Motors चे शेअर्स

६ महिन्यांमध्ये ३७% ची घसरण, आता ९३० रुपयांपर्यंत जाऊ शकतात Tata Motors चे शेअर्स

Tata Motors Share Price: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अनिश्चतेचं वातावरण आहे. अनेक दिग्गज शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालीये. टाटा मोटर्सच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:45 IST2025-02-19T15:43:57+5:302025-02-19T15:45:02+5:30

Tata Motors Share Price: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अनिश्चतेचं वातावरण आहे. अनेक दिग्गज शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालीये. टाटा मोटर्सच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली.

Tata Motors shares fell by 37 percent in 6 months now they can go up to Rs 930 know what expert said | ६ महिन्यांमध्ये ३७% ची घसरण, आता ९३० रुपयांपर्यंत जाऊ शकतात Tata Motors चे शेअर्स

६ महिन्यांमध्ये ३७% ची घसरण, आता ९३० रुपयांपर्यंत जाऊ शकतात Tata Motors चे शेअर्स

Tata Motors Share Price: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अनिश्चतेचं वातावरण आहे. अनेक दिग्गज शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालीये. टाटा मोटर्सच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. परंतु आता एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. टाटा मोटर्सचा शेअर ९३० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये सध्याच्या शेअरच्या किमतीपेक्षा ३६ टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी बीएसईवर कंपनीचा शेअर ६८२.४० रुपयांवर व्यवहार करत होता. परदेशी ब्रोकरेज हाऊस सीएलएसएनं टाटा मोटर्सचे रेटिंग 'हाय कन्व्हिक्शन आउटपरफॉर्म' असं अपग्रेड केलंय. ब्रोकरेज हाऊसनं कंपनीच्या शेअर्ससाठी ९३० रुपयांचे टार्गेट प्राइस दिलंय.

३७ टक्क्यांपर्यंतची घसरण

टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये गेल्या ६ महिन्यांत ३७ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. १९ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर १०८७.८५ रुपयांवर होता. टाटा मोटर्सचा शेअर १९ फेब्रुवारी २०२५ रोजी ६८२.४० रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या महिन्याभरात टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये जवळपास १२ टक्क्यांची घसरण झाली. तर, टाटा मोटर्सचे शेअर्स गेल्या वर्षभरात २७ टक्क्यांनी घसरलेत. कंपनीचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ११७९.०५ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ६६७ रुपये आहे.

३३० टक्क्यांहून अधिक वाढ

गेल्या पाच वर्षांत टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये ३३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २० फेब्रुवारी २०२० रोजी कंपनीचा शेअर १५८.४५ रुपयांवर होता. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर ६८२.४० रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या चार वर्षांत टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये ११८ टक्क्यांची वाढ झाली आहे. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी कंपनीचा शेअर ३१२ रुपयांवर होता. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर ६८२.४० रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या दोन वर्षांत टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Tata Motors shares fell by 37 percent in 6 months now they can go up to Rs 930 know what expert said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.