Lokmat Money >शेअर बाजार > Tata Motors Share Price : आपटून अर्ध्यावर आला TATA चा 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी स्वाहा; आता पुढे काय? 

Tata Motors Share Price : आपटून अर्ध्यावर आला TATA चा 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी स्वाहा; आता पुढे काय? 

Tata Motors Share: टाटाच्या शेअर्सची या शेअरची यावर्षी आतापर्यंत अत्यंत खराब कामगिरी राहिली आहे. कंपनीचे शेअर्स सर्वात खराब कामगिरी करणारे निफ्टी ५० चे शेअर्स बनले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:55 IST2025-02-26T13:53:28+5:302025-02-26T13:55:18+5:30

Tata Motors Share: टाटाच्या शेअर्सची या शेअरची यावर्षी आतापर्यंत अत्यंत खराब कामगिरी राहिली आहे. कंपनीचे शेअर्स सर्वात खराब कामगिरी करणारे निफ्टी ५० चे शेअर्स बनले आहेत

tata motors share price half from all time high investors loss 2 lakh crores what next what investors said | Tata Motors Share Price : आपटून अर्ध्यावर आला TATA चा 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी स्वाहा; आता पुढे काय? 

Tata Motors Share Price : आपटून अर्ध्यावर आला TATA चा 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी स्वाहा; आता पुढे काय? 

Tata Motors Share: टाटा मोटर्सच्या शेअर्सची या वर्षी आतापर्यंत अत्यंत खराब कामगिरी झाली आहे. कंपनीचे शेअर्स सर्वात खराब कामगिरी करणारे निफ्टी ५० चे शेअर्स बनले आहेत, जुलै २०२४ मधील १,१७९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून कंपनीचे शेअर्स ४४% घसरून सध्या ६६१.७५ रुपयांवर आलेत. यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये १.९ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. चीन आणि ब्रिटनसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये जग्वार लँड रोव्हरची (JLR) कमकुवत मागणी तसंच युरोपियन बनावटीच्या कारवरील संभाव्य अमेरिकी आयात शुल्काच्या चिंतेमुळे शेअर्समध्ये ही घसरण झाली आहे.

इतर तपशील काय आहेत?

प्रमुख बाजारपेठांमध्ये जेएलआरची कमकुवत मागणी आणि एम अँड एचसीव्ही आणि ईव्ही सेगमेंटमधील देशांतर्गत विक्रीच्या चिंतेमुळे टाटा मोटर्सचे शेअर्स ४४ टक्क्यांनी घसरले आहेत. कंपनीसमोर अल्पकालीन आव्हानं असली तरी ९३० ते ९३५ रुपयांच्या टार्गेट प्राइससह करेक्शनची शक्यता विश्लेषकांना दिसत आहे.

डिसेंबर तिमाही निकाल

टाटा मोटर्सचा एकत्रित निव्वळ नफा ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरून ५,५७८ कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीनं नुकतंच ऑक्टोबर-डिसेंबर २०२४ तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ७,१४५ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला होता.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला कामकाजातून मिळणारं उत्पन्न १,१३,५७५ कोटी रुपये होतं, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १,१०,५७७ कोटी रुपये होते. गेल्या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च १,०७,६२७ कोटी रुपयांवर पोहोचलाय, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १,०४,४९४ कोटी रुपये होता.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: tata motors share price half from all time high investors loss 2 lakh crores what next what investors said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.