Tata Motors Shares Price: टाटा मोटर्स लिमिटेडचे शेअर्स गुरुवारी व्यवहारादरम्यान चर्चेत होते. कंपनीचा शेअर आज इंट्राडे उच्चांकी पातळीवर १ टक्क्यांहून अधिक वाढून ८०९.०५ रुपयांवर पोहोचला. त्याची पूर्वीची बंद किंमत ७९४.८५ रुपये आहे. ब्रोकरेज फर्म मॅक्वायरीनं हा शेअर ६० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो असा विश्वास व्यक्त केलाय. मॅक्वेरीनं या शेअरवर 'आउटपरफॉर्म' रेटिंग दिलंय. तसंच याची टार्गेट प्राइस १२७८ रुपये निश्चित केलीये, जी सध्याच्या पातळीपेक्षा ६० टक्क्यांनी जास्त आहे.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मॉर्गन स्टॅन्लीचे शेअरवर इक्वलवेट रेटिंग असून टार्गेट प्राइस ९२० रुपये दिलीये. ब्रोकरेजनं आपल्या नोटमध्ये तिमाहीसाठी जेएलआरची घाऊक विक्री त्यांच्या अंदाजापेक्षा अधिक असल्याचं म्हटलंय. मॉर्गन स्टॅनलीच्या म्हणण्यानुसार, ब्रोकरेजला चालू तिमाहीसाठी जेएलआरसाठी ९.६% ईबीआयटी मार्जिनची अपेक्षा आहे आणि आर्थिक वर्ष २०२५ च्या ८.५% मार्जिन मार्गदर्शनाची पूर्तता करण्यासाठी जेएलआरला चौथ्या तिमाहीत ९.५% EBIT मार्जिन नोंदवावं लागेल.
टाटा मोटर्सवर नोमुरानं 'बाय' रेटिंग दिलं असून त्याची टार्गेट प्राईज ९९० रुपये आहे निश्चित करण्यात आली आहे. ही सध्याच्या पातळीपेक्षा २५ टक्क्यांची संभाव्य वाढ दर्शवते. ब्रोकरेजला तिसऱ्या तिमाहीत २५० मिलियन डॉलर्सचा विनामूल्य रोख प्रवाह अपेक्षित आहे. नोमुराच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या तिमाहीत २२,००० कोटी रुपये किंवा ६० रुपये प्रति शेअर निव्वळ कर्ज असलेल्या टाटा मोटर्सला आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत प्रति शेअर ८६ रुपये निव्वळ रोख रक्कम मिळू शकते.
२२ एक्सपर्ट्स म्हणाले...
टाटा मोटर्सचा समावेश असलेल्या ३६ विश्लेषकांपैकी २२ विश्लेषकांनी शेअरवर 'बाय' रेटिंग दिलंय, त्यापैकी नऊ विश्लेषकांचे 'होल्ड' रेटिंग आहे आणि त्यापैकी पाच विश्लेषकांचं शेअरवर 'सेल' रेटिंग आहे. टाटा मोटर्सचा शेअर बुधवारी ०.३ टक्क्यांनी वधारून ७९४.८५ रुपयांवर बंद झाला.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यामधील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेतं. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)