Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल

टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल

काय आहे हे प्रकरण आणि का बदलण्यात आलं कंपनीचं नाव, जाणून घेऊया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 09:33 IST2025-10-25T09:32:22+5:302025-10-25T09:33:35+5:30

काय आहे हे प्रकरण आणि का बदलण्यात आलं कंपनीचं नाव, जाणून घेऊया.

Tata Motors name changed now the company will be known by tmpv name in the stock market Big change after demerger | टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल

टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल

TATA Motors Name Change: भारतातील सर्वात विश्वसनीय ऑटो कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा मोटर्स (Tata Motors) आता एका नवीन नावानं आणि नवीन रूपात दिसू लागली आहे. कंपनीच्या बहुचर्चित डिमर्जर प्रक्रियेनंतर आता टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन व्यवसायाचं नाव बदलून टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड (TMPV) करण्यात आलंय. म्हणजेच, जर तुमच्याकडे टाटा मोटर्सचे शेअर्स असतील, तर तुमच्या डिमॅट खात्यात आता कंपनीचे नाव TMPV असं दिसेल.

नेमकं काय आहे हे प्रकरण?

टाटा मोटर्सने गेल्या वर्षी आपल्या व्यावसायिक (Commercial) आणि प्रवासी वाहन (Passenger Vehicle) व्यवसायांना वेगळं करण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून दोन्ही विभागांवर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करता येईल. आता कंपनीनं ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. व्यावसायिक युनिटचं नाव TML Commercial Vehicles Ltd (TMLCV) असेल, तर प्रवासी वाहन युनिटला TMPV हे नवीन नाव मिळालं आहे. कंपनी रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, मुंबईनं १३ ऑक्टोबर २०२५ रोजी नवीन 'सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन' जारी केलं आहे. तसेच, १४ ऑक्टोबर ही कंपनीनं डिमर्जरची रेकॉर्ड डेट निश्चित केली होती, जेणेकरून वेगळ्या झालेल्या नवीन कंपनीचे शेअर्स कोणत्या शेअरहोल्डर्सना मिळतील, हे निश्चित करता येईल.

एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न

शेअर बाजारात कशी झाली सुरुवात?

डिमर्जरनंतर TMPV चे शेअर्स शुक्रवार सकाळी किरकोळ घसरणीसह ४०६.२५ रुपये प्रति शेअरवर ट्रेड करत होते. हा शेअर १४ ऑक्टोबर रोजी स्पेशल प्राइस-डिस्कव्हरी सेशननंतर ४०० रुपयांवर उघडला होता. तेव्हापासून आतापर्यंत यात सुमारे २% ची वाढ नोंदवली गेली आहे.

शेअरहोल्डर्सना काय मिळणार?

ज्या गुंतवणूकदारांकडे रेकॉर्ड डेट म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी टाटा मोटर्सचे शेअर्स होते, त्यांना टाटा मोटर्सच्या प्रत्येक १ शेअरमागे डिमर्जरनंतर तयार झालेल्या TMLCV कंपनीचा १ शेअर मिळेल. व्यावसायिक वाहन युनिटचं (TMLCV) ट्रेडिंग BSE आणि NSE वर नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

हा मोठा बदल का करण्यात आला?

कंपनीचं म्हणणं आहे की, व्यवसायाला वेगवेगळ्या दिशांनी लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि वाढीसाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. प्रवासी वाहन युनिट आता इलेक्ट्रिक व्हेइकल (EV) आणि जॅग्वार लँड रोव्हर (JLR) यांसारख्या विभागांवर लक्ष केंद्रित करेल, तर व्यावसायिक युनिट ट्रक्स आणि बसेसचा व्यवसाय पुढे नेईल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : टाटा मोटर्स का बदला नाम: डिमर्जर के बाद नई पहचान

Web Summary : टाटा मोटर्स के यात्री वाहन इकाई का नाम अब टाटा मोटर्स पैसेंजर व्हीकल्स लिमिटेड (TMPV) है। शेयरधारकों को टीएमएलसीवी शेयर मिलेंगे। इस विभाजन का उद्देश्य इलेक्ट्रिक वाहनों सहित वाणिज्यिक और यात्री वाहन व्यवसायों पर ध्यान केंद्रित करना है।

Web Title : Tata Motors Rebranded: New Name & Stock Market Identity Post-Demerger

Web Summary : Tata Motors' passenger vehicle unit is now Tata Motors Passenger Vehicles Limited (TMPV) after the demerger. Shareholders receive TMLCV shares. This split aims to sharpen focus and growth for both commercial and passenger vehicle businesses, including EVs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.