Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

Tata Motors Demerger: सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी टाटा मोटर्सचा शेअर गुंतवणूकदारांसाठी एक नवीन अध्याय घेऊन आला. पाहा टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये नक्की काय घडलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:57 IST2025-10-14T13:56:59+5:302025-10-14T13:57:32+5:30

Tata Motors Demerger: सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी टाटा मोटर्सचा शेअर गुंतवणूकदारांसाठी एक नवीन अध्याय घेऊन आला. पाहा टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये नक्की काय घडलं.

Tata Motors Demerger stocks saw a 40 percent decline what is the real story behind this and what will happen next | Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

Tata Motors Demerger: सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी टाटा मोटर्सचा शेअर गुंतवणूकदारांसाठी एक नवीन अध्याय घेऊन आला. कंपनीच्या डिमर्जरनंतर आज त्याची एक्स-डेट होती आणि या खास प्रसंगी शेअर बाजारातटाटा मोटर्सच्या शेअरची नवीन किंमत निश्चित झाली. एनएसई (NSE) वर टाटा मोटर्सचा शेअर ₹४०० प्रति शेअरवर आला, जो मागील क्लोजिंग किंमत ₹६६०.७५ पेक्षा सुमारे ३९.५% कमी आहे. ही घसरण पहिल्या दृष्टिक्षेपात आश्चर्यकारक वाटू शकते, पण प्रत्यक्षात हा कंपनीच्या व्यावसायिक वाहन व्यवसायाच्या वेगळं होण्याचा (डिमर्जर ॲडजस्टमेंट) परिणाम आहे.

काय आहे डिमर्जरची संपूर्ण प्रक्रिया?

टाटा मोटर्सने आपले दोन प्रमुख व्यवसाय - प्रवासी वाहनं आणि व्यावसायिक वाहनं वेगळे करण्याचा निर्णय घेतला होता. आता व्यावसायिक वाहन व्यवसाय नवीन कंपनी 'TML Commercial Vehicles Limited (TMLCV)' मध्ये हस्तांतरित केला जाईल, तर प्रवासी वाहनं आणि जेएलआरचा (JLR - Jaguar Land Rover) व्यवसाय सध्याच्या कंपनीच्या अंतर्गत राहील, जिचं नवीन नाव 'Tata Motors Passenger Vehicles Limited (TMPVL)' असेल. या डिमर्जरअंतर्गत गुंतवणूकदारांना १:१ च्या प्रमाणात शेअर्स मिळतील – म्हणजेच ज्यांच्याकडे टाटा मोटर्सचा १ शेअर आहे, त्यांना TMLCV चा देखील १ शेअर मिळेल. नवीन शेअर्सची लिस्टिंग नोव्हेंबर २०२५ मध्ये बीएसई (BSE) आणि एनएसई दोन्हीवर होईल.

एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा

शेअरची किंमत का घसरली?

डिमर्जरनंतर जो टाटा मोटर्सचा शेअर आता बाजारात ट्रेड करत आहे, तो केवळ प्रवासी वाहन आणि जेएलआर व्यवसायाचे प्रतिनिधित्व करेल. त्यामुळे, व्यावसायिक वाहनांचा भाग आता वेगळा झाल्यामुळे, शेअरची व्हॅल्यू पूर्वीपेक्षा कमी दिसत आहे. स्पेशल प्री-ओपन सेशनमध्ये (सकाळी ९:०० ते सकाळी १०:०० पर्यंत) मार्केटनं या नवीन स्ट्रक्चरनुसार शेअरची नवीन किंमत ₹४०० प्रति शेअर (NSE) आणि ₹३९९ प्रति शेअर (BSE) निश्चित केली.

जेफरीजचे अंदाज: दोन्ही युनिट्सची व्हॅल्यू किती?

जेफरीजचं मानणं आहे की भारताचा पीव्ही व्यवसाय आणि सीव्ही मार्जिन दोन्ही मजबूत आहेत आणि येथे मागणीचा ट्रेंड वाढतच राहील. तथापि, जेएलआरसाठी कंपनीला, विशेषतः युरोप आणि चीनसारख्या बाजारपेठांमध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : टाटा मोटर्स के शेयरों में 40% गिरावट: आगे क्या होगा?

Web Summary : टाटा मोटर्स के शेयरों में डिमर्जर के बाद लगभग 40% की गिरावट आई, वाणिज्यिक वाहन संचालन अलग हो गए। निवेशकों को टीएमएलसीवी में 1:1 शेयर मिलते हैं। कीमत शेष यात्री वाहन और जेएलआर व्यवसायों को दर्शाती है। जेफ़रीज़ के विश्लेषकों ने दोनों इकाइयों के लिए ताकत और चुनौतियों पर प्रकाश डाला।

Web Title : Tata Motors shares drop 40% after demerger: What's next?

Web Summary : Tata Motors shares fell nearly 40% post demerger, with commercial vehicle operations separating. Investors receive 1:1 shares in TMLCV. The price reflects the remaining passenger vehicle and JLR businesses. Jefferies analysts highlight strengths and challenges for both units.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.