Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर

TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर

TATA Share Price: टाटा समूहाच्या या शेअरची सध्या बाजारात वाईट अवस्था आहे. कंपनीचे शेअर्स त्यांच्या उच्चांकावरून ५० टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:34 IST2025-12-11T15:34:01+5:302025-12-11T15:34:01+5:30

TATA Share Price: टाटा समूहाच्या या शेअरची सध्या बाजारात वाईट अवस्था आहे. कंपनीचे शेअर्स त्यांच्या उच्चांकावरून ५० टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

TATA group trent company stock down by 50 percent from all time high hit new low | TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर

TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर

TATA Share Price: टाटा समूहाच्या रिटेल कंपनी 'ट्रेंट'च्या शेअर्सची सध्या बाजारात वाईट अवस्था आहे. कंपनीचे शेअर्स त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावरून ५० टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. गुरुवार, ११ डिसेंबर रोजी ट्रेंटचे शेअर्स घसरणीसह ३९३१.४५ रुपयांवर पोहोचले आणि त्यांनी ५२ आठवड्यांचा नवा नीचांक गाठला. ट्रेंटचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ४५ टक्क्यांहून अधिक खाली आले आहेत.

गेल्या काही काळापासून ट्रेंटच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ४३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या घसरणीमुळे कंपनीच्या बाजार मूल्याचे (Market Value) १ लाख कोटींहून अधिक नुकसान झाले असून, तिचे मार्केट कॅप कमी होऊन १.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

IPO पूर्वी झुनझुनवाला कुटुंबानं 'या' कंपनीत केली ₹१०० कोटींची गुंतवणूक, अन्य २५ दिग्गजांनीचीही इनव्हेस्टमेंट

ऑल टाइम हायवरून ५०% हून अधिक घसरण

टाटा समूहाच्या ट्रेंट कंपनीचे शेअर्स १४ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्या आजवरची उच्चांक ८३४५.८५ रुपये पातळीवर होते. ११ डिसेंबर २०२५ रोजी हे शेअर्स ३९३१.४५ रुपयांवर पोहोचले असून, या उच्चांकावरून ते ५० टक्क्यांहून अधिक खाली आले आहेत. गेल्या सहा महिन्यांत ट्रेंटच्या शेअर्समध्ये ३० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. गेल्या एका वर्षात कंपनीचे शेअर्स ४३ टक्क्यांहून अधिक तुटले आहेत. ११ डिसेंबर २०२४ रोजी ट्रेंटचे शेअर्स ७०६३.३० रुपयांवर होते आणि ११ डिसेंबर २०२५ रोजी ते ३९३१.४५ रुपयांवर आले आहेत.

ब्रोकरेज हाऊसेसचं मत काय?

इकॉनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, दिग्गज ब्रोकरेज हाउसेसनं ट्रेंटच्या शेअर्सबद्दल वेगवेगळी मतं दिली आहेत. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस गोल्डमॅन सॅक्सने ट्रेंटला 'न्यूट्रल' रेटिंग देत ४९२० रुपये टार्गेट प्राईज दिली आहे. ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीननं 'ट्रेंट'ला 'आउटपरफॉर्म' रेटिंग देत ५००० रुपये टार्गेट प्राईज निश्चित केली आहे. अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजनं कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राईज ६१६० रुपयांवरून कमी करून ५१०० रुपये केली आहे. सिटीनं ट्रेंटच्या शेअर्सना 'सेल' रेटिंग देत टार्गेट प्राईज ४३५० रुपये केली.

५ वर्षांत ४७०% वाढ

सध्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असली तरी, टाटा समूहाच्या ट्रेंटचे शेअर्स गेल्या पाच वर्षांत ४७० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. ११ डिसेंबर २०२० रोजी ट्रेंटचे शेअर्स ६८९.३५ रुपये होते, जे ११ डिसेंबर २०२५ रोजी बीएसईवर ३९३१.४५ रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या ४ वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये २७५ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. तीन वर्षांत ट्रेंटचे शेअर्स १६५ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. तर दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ३० टक्क्यांची तेजी आली आहे.

ट्रेंटनं सप्टेंबर २०१६ मध्ये आपल्या शेअर्सचे विभाजन केलं होतं. कंपनीनं १० रुपये फेस व्हॅल्यूच्या एका शेअरचे विभाजन करून ते १-१ रुपये फेस व्हॅल्यूच्या १० शेअर्समध्ये केलं आहे. कंपनीमध्ये प्रमोटर्सचा हिस्सा ३७.०१ टक्के आहे, तर सार्वजनिक भागभांडवल ६२.९९ टक्के आहे.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : Tata का ट्रेंट शेयर 50% से अधिक गिरा, नया निचला स्तर

Web Summary : टाटा के ट्रेंट शेयर की कीमत में भारी गिरावट, उच्च स्तर से 50% से अधिक गिरावट, 52 सप्ताह के नए निचले स्तर पर पहुंची। इसके बावजूद, स्टॉक पिछले पांच वर्षों में काफी बढ़ा है, हालाँकि ब्रोकरेज की मिली-जुली राय है।

Web Title : Tata's Trent Share Plummets Over 50%, Hits New Low

Web Summary : Tata's Trent share price has crashed, falling over 50% from its high, reaching a new 52-week low. Despite this, the stock has risen significantly over the past five years, though brokerages have mixed views.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.