Lokmat Money >शेअर बाजार > ₹४००० पार जाऊ शकतो टाटाचा 'हा' शेअर, रेखा झुनझुनवालांकडे आहेत ९५ लाख शेअर्स; तुमच्याकडे आहेत?

₹४००० पार जाऊ शकतो टाटाचा 'हा' शेअर, रेखा झुनझुनवालांकडे आहेत ९५ लाख शेअर्स; तुमच्याकडे आहेत?

Tata group stock to buy: देशातील सर्वात मोठी ज्वेलरी आणि वॉच कंपनीचे शेअर्स सातत्यानं चर्चेत असतात. कंपनीचा शेअर मंगळवारी किरकोळ वधारून ३१८७.४० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:38 IST2025-02-25T12:36:04+5:302025-02-25T12:38:21+5:30

Tata group stock to buy: देशातील सर्वात मोठी ज्वेलरी आणि वॉच कंपनीचे शेअर्स सातत्यानं चर्चेत असतात. कंपनीचा शेअर मंगळवारी किरकोळ वधारून ३१८७.४० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

tata group titan share might go above rs 4000 brokerage bullish rekha jhunjhunwala have more than 95 lakhs shares | ₹४००० पार जाऊ शकतो टाटाचा 'हा' शेअर, रेखा झुनझुनवालांकडे आहेत ९५ लाख शेअर्स; तुमच्याकडे आहेत?

₹४००० पार जाऊ शकतो टाटाचा 'हा' शेअर, रेखा झुनझुनवालांकडे आहेत ९५ लाख शेअर्स; तुमच्याकडे आहेत?

Tata group stock to buy: देशातील सर्वात मोठी ज्वेलरी आणि वॉच कंपनी टायटनचे शेअर्स सातत्यानं चर्चेत असतात. टायटनचा शेअर मंगळवारी किरकोळ वधारून ३१८७.४० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. सोमवारी कामकाजाच्या अखेरिस त्याची किंमत ३१७२.५५ रुपये होती. टाटाच्या या शेअरवर ब्रोकरेज कंपन्या बुलिश असून ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्या मालकीच्या टायटन कंपनीच्या शेअर्सनी गेल्या सहा महिने आणि वर्षभरात नकारात्मक परतावा दिलाय. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे ९५,४०,५७५ शेअर्स आहेत. हे १.०७ टक्के हिस्स्याइतकं आहे.

टार्गेट प्राइस काय आहे?

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालनं टायटनच्या शेअरवर 'बाय' रेटिंग दिलं असून टार्गेट प्राइस ४,००० रुपये केली आहे. दुसरीकडे, बीएनपी परिबास इंडियाचे शेअरवर आउटपरफॉर्म रेटिंग दिलंय आणि टार्गेट प्राईज ४,०५० रुपये दिलंय. बीएनपी परिबासनं, बाजारात दबदबा असूनही उद्योगात त्याचा वाटा केवळ ७-८ टक्के आहे. पॅनकार्ड जाहीर करणं आणि दागिन्यांचं हॉलमार्किंग करणे यासारख्या संरचनात्मक बदलांमधून दागिने उद्योगात बदल झाले आहेत, ज्याचा फायदा तनिष्क (टायटनच्या मालकीच्या) सारख्या मोठ्या, राष्ट्रीय आणि विश्वासार्ह ब्रँड्सना झाला आहे. टायटनच्या व्यवस्थापनाने प्रत्येक विभागासाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित केली असून मध्यावधीत ज्वेलरी विभागाची विक्री १५ ते २० टक्के सीएजीआरने वाढेल, अशी अपेक्षा आहे. मंदी असूनही कंपनीने हे उद्दिष्ट साध्य केल्याचं त्यांनी म्हटलंय.

डिसेंबर तिमाही निकाल

टाटा समूहाच्या टायटन कंपनीचा नफा तिसऱ्या तिमाहीत ०.६ टक्क्यांनी घसरून १,०४७ कोटी रुपयांवर आला आहे, तर एकूण उत्पन्न २५ टक्क्यांनी वाढून १७,७२३ कोटी रुपयांवर पोहोचलंय. दरम्यान, एकत्रित एबिटडा वार्षिक आधारावर ५ टक्क्यांनी वाढून १,६२७ कोटी रुपयांवर पोहोचला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरची माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: tata group titan share might go above rs 4000 brokerage bullish rekha jhunjhunwala have more than 95 lakhs shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.