Lokmat Money >शेअर बाजार > ₹४५० पर्यंत जाऊ शकतो TATA चा शेअर, गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

₹४५० पर्यंत जाऊ शकतो TATA चा शेअर, गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी दिसून येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 15:45 IST2024-01-25T15:44:57+5:302024-01-25T15:45:10+5:30

टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजी दिसून येत आहे.

tata group tata power share may go up to rs 450 investors jump to buy Experts are bullish advice to buy | ₹४५० पर्यंत जाऊ शकतो TATA चा शेअर, गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

₹४५० पर्यंत जाऊ शकतो TATA चा शेअर, गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

Tata Group Stock: टाटा समूहाची कंपनी टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये (Tata Power Share) आज वाढ दिसून येत आहे. इंट्राडे ट्रेडमध्ये कंपनीचे शेअर्स 2.6 टक्क्यांनी वाढून 366.55 रुपयांवर पोहोचले. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा नवा उच्चांकी स्तर आहे. टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये या वाढीमागे एक मोठं कारण आहे. खरं तर, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चनं टाटा समूहाच्या फर्मची लाँग टर्म इश्यूअर रेटिंग 'IND AA' वरून 'IND AA Plus' अपग्रेड केलं आहे. यानंतर टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या समभागांनी आज विक्रमी उच्चांक गाठला. टाटा पॉवरचा शेअर बीएसईवर 2.68 टक्क्यांनी वाढून 366.55 रुपयांवर पोहोचला. टाटा पॉवर स्टॉकची 52 आठवड्यांच्या नीचांकी किंमत 182.45 रुपये आहे. 28 मार्च 2023 रोजी कंपनीच्या शेअर्सनं नीचांकी स्तर गाठला होता.

ब्रोकरेजचं म्हणणं काय?

टाटा पॉवरचा शेअर एका वर्षात 80.25% आणि सहा महिन्यांत 65.55% वाढला आहे. टाटा पॉवरचे मार्केट कॅप 1.16 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढलंय. IIFL सिक्युरिटीजने टाटा पॉवरला 'अॅड' मध्ये अपग्रेड केलं आहे. "टाटा पॉवर आपल्या डायव्हर्सिफिकेशन स्ट्रॅटजीवर ठाम आहे. टाटा पॉवरला दोन आघाड्यांवर देखील फायदा होत आहे पहिलं म्हणजे विजेची मागणी वाढण्याची शक्यता आहे आणि AT&C तोटा कमी झाल्यामुळे वितरण विभागामध्ये चांगली कमाई झाली आहे," असं आयआयएफएल सिक्युरिटीजने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.

टार्गेट प्राईज वाढवलं

या महिन्याच्या अखेरीस स्टॉक 385 रुपयांच्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याचा 342 रुपयांचा स्टॉप लॉस आहे, असं ICICIDirect रिसर्चनं म्हटलं आहे. 20-दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर  रिट्रेसमेंटनंतर किमतीत पुन्हा तेजीची दिसून येत आहे. त्यामुळे खरेदीची मागणी वाढल्याचे दिसून येत असल्याचं त्यांनी म्हटलं.

अँटिक ब्रोकिंगनं टाटा पॉवरसाठी आपली टार्गेट प्राईज 422 रुपयांवरून वाढवून 450 रुपये केली आहे.तर ब्रोकरेज कंपनी शेअरखाननं हा शेअर 390 च्या स्तरापर्यंत पोहोचेल असा विश्वास व्यक्त केलाय.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: tata group tata power share may go up to rs 450 investors jump to buy Experts are bullish advice to buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.