Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या

Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या

Tata Capital IPO Allotment Status: टाटा समूहाची कंपनी टाटा कॅपिटलच्या आयपीओसाठी बुकिंग बंद झालं आहे आणि शेअर्सचे वाटप आज ९ ऑक्टोबर रोजी होऊ शकतं. १५,५१२ कोटी रुपयांचा हा आयपीओ काल, बुधवारी तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पूर्णपणे सबस्क्राइब झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:48 IST2025-10-09T12:47:40+5:302025-10-09T12:48:25+5:30

Tata Capital IPO Allotment Status: टाटा समूहाची कंपनी टाटा कॅपिटलच्या आयपीओसाठी बुकिंग बंद झालं आहे आणि शेअर्सचे वाटप आज ९ ऑक्टोबर रोजी होऊ शकतं. १५,५१२ कोटी रुपयांचा हा आयपीओ काल, बुधवारी तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पूर्णपणे सबस्क्राइब झाला.

Tata Capital IPO Allotment Did you get the shares IPO or not How to check the status what is the status of GMP | Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या

Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या

Tata Capital IPO Allotment Status:टाटा समूहाची कंपनी टाटा कॅपिटलच्या आयपीओसाठी बुकिंग बंद झालं आहे आणि शेअर्सचे वाटप आज ९ ऑक्टोबर रोजी होऊ शकतं. १५,५१२ कोटी रुपयांचा हा आयपीओ काल, बुधवारी तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पूर्णपणे सबस्क्राइब झाला. हा आयपीओ १.९५ पट सबस्क्राइब झाला. म्हणजेच, ३३.३४ कोटी शेअर्सच्या तुलनेत, गुंतवणूकदारांनी ३३.६४ कोटी शेअर्ससाठी बोली लावली. याचा अर्थ असा की ऑफर केलेल्या शेअर्सच्या संख्येपेक्षा जास्त मागणी होती. या मागणीत सर्वात मोठा वाटा क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स (QIB) आणि नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स (NII) यांचा होता.

अलॉटमेंटचं स्टेटस कसं तपासावं?

टाटा कॅपिटल आयपीओ अलॉटमेंटचं स्टेटस दोन प्रकारे तपासता येतं. पहिली पद्धत म्हणजे रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर (MUFG Intime India) जाऊन. दुसरी पद्धत म्हणजे बीएससीच्या वेबसाइटवर जाऊन. अलॉटमेंट लाइव्ह होताच, तुम्ही या ठिकाणी आपली स्थिती पाहू शकता.

असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास

पहिली पद्धत: रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर

१. रजिस्ट्रारच्या वेबसाइट in.mpms.mufg.com/Initial_Offer/public-issues.html वर जा.

२. ड्रॉपडाउन मेन्यूमधून टाटा कॅपिटल आयपीओ निवडा.

३. आता तुम्हाला तुमचा अप्लिकेशन नंबर (Application No.) किंवा पॅन नंबर (PAN No.) टाकावा लागेल.

४. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करताच, तुम्हाला शेअर्स मिळाले आहेत की नाही हे कळेल.

दुसरी पद्धत: बीएससीच्या वेबसाइटवर

१. बीएसईच्या वेबसाइट bseindia.com/investors/appli_check.aspx वर जा.

२. आता Issue Type मध्ये Equity निवडा.

३. त्यानंतर Issue Name मध्ये Tata Capital Limited निवडा.

४. आता Application No किंवा PAN नंबर टाका आणि सबमिट करा. तुम्हाला शेअर्स मिळाले आहेत की नाही हे कळेल.

ज्यांना शेअर्स मिळाले नाहीत, त्यांच्या पैशांचं काय?

ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स मिळणार नाहीत, त्यांचे पैसे किंवा युपीआय मॅन्डेट १० ऑक्टोबरपर्यंत परत येतील. तर, ज्या लोकांना शेअर्सचं वाटप झालं आहे, त्यांच्या डीमॅट खात्यात १० ऑक्टोबरपर्यंत शेअर्स जमा केले जातील. टाटा कॅपिटलचे शेअर्स १३ ऑक्टोबरला बीएससी आणि एनएसई दोन्हीवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.

ग्रे मार्केटमध्ये भाव अजून घसरला

ग्रे मार्केटमध्ये टाटा कॅपिटल आयपीओचा जीएमपी (GMP) अजून कमी झाला आहे. बुधवारी बोलीच्या शेवटच्या दिवशीही त्यात घसरण झाली. गुरुवारी सकाळी १०:३० वाजता त्याचा जीएमपी १.०७% सह ३२९.५ रुपये होता. म्हणजेच, प्रति शेअर गुंतवणूकदारांना ३.५० रुपयांचा फायदा दिसत आहे. यापूर्वी ज्या दिवशी आयपीओ उघडला होता, तेव्हा त्याचा जीएमपी वाढला होता.

बाजार तज्ज्ञांचं मत

बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे की हा कमी ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) गुंतवणूकदारांच्या रुचीचा अभाव नसून, कंपनीचे योग्य व्हॅल्यूएशन (Valuation) दर्शवतो. त्यांचं म्हणणं आहे की, आयपीओची किंमत दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अगदी योग्य ठेवण्यात आली होती. टाटा कॅपिटलचा व्यवसाय मॉडेल खूप मजबूत आहे. ही विविध प्रकारचे कर्ज देते, जोखीम व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करते आणि डिजिटल कर्जावर देखील लक्ष केंद्रित करत आहे. या सर्व कारणांमुळे कंपनीच्या सततच्या वाढीची चांगली शक्यता आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : टाटा कैपिटल आईपीओ आवंटन: स्थिति, जीएमपी विवरण यहां जांचें

Web Summary : टाटा कैपिटल आईपीओ आवंटन की स्थिति रजिस्ट्रार या बीएसई वेबसाइट के माध्यम से ऑनलाइन जांच की जा सकती है। असफल आवेदकों को 10 अक्टूबर तक धन वापस मिल जाएगा। शेयर 13 अक्टूबर को सूचीबद्ध होने की उम्मीद है। जीएमपी उचित मूल्यांकन को दर्शाता है।

Web Title : Tata Capital IPO Allotment: Check Status, GMP Details Here

Web Summary : Tata Capital IPO allotment status can be checked online via registrar or BSE website. Unsuccessful applicants will receive refunds by October 10th. Shares are expected to list on October 13th. GMP indicates a slight premium, reflecting fair valuation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.