Lokmat Money >शेअर बाजार > १० महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 'या' शेअरमध्ये १४००% ची तुफानी तेजी, विजय केडियांचीही आहे गुंतवणूक

१० महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 'या' शेअरमध्ये १४००% ची तुफानी तेजी, विजय केडियांचीही आहे गुंतवणूक

Tac Infosec Share: गुरुवारी, २३ जानेवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर १६०६ रुपयांवर पोहोचला. कंपनीचा आयपीओ २७ मार्च २०२४ रोजी उघडला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:18 IST2025-01-23T15:16:51+5:302025-01-23T15:18:02+5:30

Tac Infosec Share: गुरुवारी, २३ जानेवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर १६०६ रुपयांवर पोहोचला. कंपनीचा आयपीओ २७ मार्च २०२४ रोजी उघडला होता.

Tac Infosec Share This stock has skyrocketed by 1400 percent in less than 10 months investor Vijay Kedia is also invested | १० महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 'या' शेअरमध्ये १४००% ची तुफानी तेजी, विजय केडियांचीही आहे गुंतवणूक

१० महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 'या' शेअरमध्ये १४००% ची तुफानी तेजी, विजय केडियांचीही आहे गुंतवणूक

Tac Infosec Share: टॅक इन्फोसेक या छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. १० महिन्यांपेक्षा कमी कालावधीत टॅक इन्फोसेकच्या शेअरमध्ये १४००% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. गुरुवारी, २३ जानेवारी २०२५ रोजी कंपनीचा शेअर १६०६ रुपयांवर पोहोचला. टॅक इन्फोसेकचा आयपीओ २७ मार्च २०२४ रोजी उघडला होता. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत १०६ रुपये होती. अनुभवी गुंतवणूकदार विजय केडिया यांनी टॅक इन्फोसेकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. केडिया कुटुंबाकडे कंपनीचे १५ लाखांहून अधिक शेअर्स आहेत.

आयपीओमध्ये किंमत १०६ रुपये

आयपीओमध्ये टॅक इन्फोसेकच्या शेअरची किंमत १०६ रुपये होती. ५ एप्रिल २०२४ रोजी कंपनीचे शेअर्स १७० टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर २९० रुपयांवर बाजारात लिस्ट झाले. लिस्टिंगच्या दिवशी कंपनीचा शेअर ३०४.५० रुपयांवर बंद झाला. लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. टॅक इन्फोसेकचा शेअर २३ जानेवारी २०२५ रोजी १६०६ रुपयांवर पोहोचला. १०६ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत कंपनीचे शेअर्स १४०० टक्क्यांहून अधिक वधारले आहेत.

केडियांकडे १५ लाखांपेक्षा अधिक शेअर्स

दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांची टॅक इन्फोसेकमध्ये मोठी गुंतवणूक आहे. केडिया कुटुंबाकडे टॅक इन्फोसेकचे १५३०००० शेअर्स आहेत. विजय केडिया यांच्या वैयक्तिक पोर्टफोलिओमध्ये टॅक इन्फोसेकचे ११ लाख ४७ हजार ५०० शेअर्स आहेत. कंपनीत त्यांचा १०.९५ टक्के हिस्सा आहे. विजय केडिया यांचा मुलगा अंकित विजय केडिया यांच्याकडे या कंपनीचे ३ लाख ८२ हजार ५०० शेअर्स आहेत. अंकित केडिया यांचा कंपनीत ३.६५ टक्के हिस्सा आहे. म्हणजेच टॅक इन्फोसेकमध्ये केडिया कुटुंबाचा एकूण हिस्सा १४.६ टक्के आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Tac Infosec Share This stock has skyrocketed by 1400 percent in less than 10 months investor Vijay Kedia is also invested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.