Suzlon Shares : एनर्जी कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर्स गेल्या सहा महिन्यांत सुमारे 30 टक्क्यांनी घसरले आहेत. बुधवारी(26 मार्च, 2025) कंपनीचे शेअर्स रु. 57.47 वर बंद झाले. ही कमकुवत कामगिरी असूनही, कंपनीच्या कामगिरीमुळे देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालने या शेअरला बाय रेटिंग दिली आहे. मोतीलाल ओसवाल यांना विश्वास आहे की, कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होऊ शकते. सुझलॉन एनर्जी शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी 86.04 रुपये आहे, तर निच्चांकी 36.80 रुपये आहे.
मोतीलाल ओसवालने दिले 70 रुपयांचे टार्गेट
देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालने सुझलॉन एनर्जीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने कंपनीच्या शेअर्सचे टार्गेट 70 रुपये ठेवले आहे. याचा अर्थ ऊर्जा कंपनीचे शेअर्स बुधवारच्या बंद पातळीपासून सुमारे 22% ने वाढू शकतात. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, सुझलॉन एनर्जी पवन ऊर्जेमध्ये जागतिक आघाडीवर आहे आणि 17 देशांमध्ये 20.9 GW एवढी स्थापित क्षमता आहे. सुझलॉन एनर्जी ही देशातील सर्वोच्च पवन ऊर्जा सेवा प्रदातादेखील असून, क्षमता 15GW इतकी आहे.
शेअर्समध्ये 5 वर्षांत 3200% पेक्षा जास्त वाढ
सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये गेल्या पाच वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 3241% वाढ झाली आहे. पवन ऊर्जा व्यवसायात गुंतलेल्या सुझलॉन एनर्जीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी 1.72 रुपयांवर होते. 26 मार्च 2025 रोजी कंपनीचे शेअर्स 57.47 रुपयांवर बंद झाले. गेल्या चार वर्षांत सुझलॉन एनर्जीचे शेअर्स 1038% ने वाढले आहेत.
(टीप- हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या.)