Vi, Airtel Shares Supreme Court: व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेललासर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. यानंतर कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत ५ टक्क्यांची घसरण झाली. सर्वोच्च न्यायालयानं या कंपन्यांच्या वतीनं दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.
काय आहे प्रकरण?
टेलिकॉम कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. अहवालानुसार, कंपन्यांनी म्हटलंय की, थकित अॅडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यूच्या (AGR) मोजणीत विसंगती आहे. पण या नव्या निर्णयानं २०२१ चा निर्णय कायम ठेवला आहे. त्याचबरोबर टेलिकॉम कंपन्यांना आता कोणताही कायदेशीर आधार राहिलेला नाही.
दूरसंचार विभागानं एजीआर गणनेत चुका केल्याचा युक्तिवाद दूरसंचार कंपन्यांनी केला. पण सर्वोच्च न्यायालयानं जुना निर्णय कायम ठेवला आहे. त्याचवेळी मोजणीची मागणी पुन्हा फेटाळण्यात आली. हे प्रकरण जुलै २०२१ मधील आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयानं टेलिकॉम कंपन्यांची याचिका रद्द केली होती.
कंपन्यांच्या शेअरमध्ये आज घसरण
व्होडाफोन आयडियाचा शेअर तेजीसह ८.७५ रुपयांवर उघडला. पण काही काळानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत ८.१४ रुपयांच्या पातळीवर आली. व्होडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये आज ५ टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली.
शेअर बाजारात भारती एअरटेलच्या शेअरमध्येही घसरण सुरू आहे. कंपनीचा शेअर १७२४.१५ रुपयांच्या पातळीवर उघडला. पण तो १७०५ रुपयांच्या पातळीवर घसरला. भारती एअरटेलचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १७७८.९५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १०९८ रुपये आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला भारत सरकारनं एजीआरची थकबाकी माफ करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचं वृत्त आलं होतं.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)