Lokmat Money >शेअर बाजार > Sunshine Pictures IPO: 'द केरला स्टोरी'च्या प्रोड्युसरच्या कंपनीचा येणार IPO; कमाईची संधी, SEBIची मंजुरी मिळणार?

Sunshine Pictures IPO: 'द केरला स्टोरी'च्या प्रोड्युसरच्या कंपनीचा येणार IPO; कमाईची संधी, SEBIची मंजुरी मिळणार?

Sunshine Pictures IPO: २०२५ या वर्षातही अनेक आयपीओ येण्याच्या तयारीत आहेत. यंदा मनोरंजन क्षेत्रातील कंपन्याही आयपीओ घेऊन येत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:20 IST2025-01-04T14:19:48+5:302025-01-04T14:20:21+5:30

Sunshine Pictures IPO: २०२५ या वर्षातही अनेक आयपीओ येण्याच्या तयारीत आहेत. यंदा मनोरंजन क्षेत्रातील कंपन्याही आयपीओ घेऊन येत आहेत.

Sunshine Pictures IPO The Kerala Story producer vipul amritlal shah company ipo to come Earning opportunity will it get SEBI approval | Sunshine Pictures IPO: 'द केरला स्टोरी'च्या प्रोड्युसरच्या कंपनीचा येणार IPO; कमाईची संधी, SEBIची मंजुरी मिळणार?

Sunshine Pictures IPO: 'द केरला स्टोरी'च्या प्रोड्युसरच्या कंपनीचा येणार IPO; कमाईची संधी, SEBIची मंजुरी मिळणार?

Sunshine Pictures IPO: २०२५ या वर्षातही अनेक आयपीओ येण्याच्या तयारीत आहेत. यंदा मनोरंजन क्षेत्रातील कंपन्याही आयपीओ घेऊन येत आहेत. यापैकी एक आयपीओ-सनशाईन पिक्चर्स लिमिटेड असू शकतो. निर्माते आणि दिग्दर्शक विपुल अमृतलाल शहा यांच्या मालकीच्या सनशाईन पिक्चर्स लिमिटेड या चित्रपट निर्मिती संस्थेनं आयपीओच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रं दाखल केली आहेत.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) दाखल केलेल्या दस्तऐवजानुसार, ८३.७५ लाख शेअर्सचा प्रस्तावित आयपीओ ५० लाख नवीन शेअर्स आणि ३३.७५ लाख समभागांची ऑफर फॉर सेल (ओएफएस) मिळून आहे. प्रवर्तक विपुल अमृतलाल शहा २३.६९ लाख शेअर्स विकण्याची योजना आखत आहेत, तर शेफाली विपुल शहा १०.०५ लाख शेअर्स विकण्याची योजना आखत आहेत.

रकमेचं काय करणार?

सनशाईन पिक्चर्स लिमिटेडनं आयपीओमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर आपल्या दीर्घकालीन कार्यशील भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी करण्याची योजना आखली आहे. याव्यतिरिक्त, ९४ कोटी रुपये भविष्यातील विकास आणि ऑपरेशन्ससह इतर सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरले जातील. आयपीओसाठी जीवायआर कॅपिटल अॅडव्हायझर्स ही एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर असेल.

कंपनीबद्दल माहिती

सनशाईन पिक्चर्स ही चित्रपट आणि वेब सीरिजची निर्मिती, विकास, मार्केटिंग आणि डिस्ट्रिब्युशनच्या व्यवसायात गुंतलेली एक प्रसिद्ध प्रॉडक्शन कंपनी आहे. या कंपनीच्या लोकप्रिय प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर केरला स्टोरी, कमांडो, फोर्स, अॅक्शन रिप्ले यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. केरला स्टोरीवरून बराच वाद झाला होता. विपुल शहा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सनशाईन पिक्चर्सची स्पर्धा पॅनोरमा स्टुडिओ इंटरनॅशनल, बवेजा स्टुडिओज आणि बालाजी टेलिफिल्म्स सारख्या लिस्टेड कंपन्यांशी होणार आहे.

कंपनी नफ्यात

सनशाईन पिक्चर्स लिमिटेड गेल्या तीन आर्थिक वर्षांपासून आणि आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत नफ्यात आहे. वित्त वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीचा नफा ४५.६४ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ५२.४५ कोटी रुपये, आर्थिक २०२३ मध्ये २.३१ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ११.२ कोटी रुपये होता. 

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचं कामकाजातून उत्पन्न १३३.८ कोटी रुपये, २०२३ मध्ये २६.५१ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ८७.१३ कोटी रुपये होतं, तर आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीनं ३९.०२ कोटी रुपये कमावले.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Sunshine Pictures IPO The Kerala Story producer vipul amritlal shah company ipo to come Earning opportunity will it get SEBI approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.