Lokmat Money >शेअर बाजार > सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या सीरिजमध्ये घसरणीसह बंद! या शेअर्समध्ये सर्वाधिक पडझड

सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या सीरिजमध्ये घसरणीसह बंद! या शेअर्समध्ये सर्वाधिक पडझड

Stock Market : शेवटच्या ३ सीरिजमध्ये बाजार १०% खाली बंद झाला. जून २०२२ नंतर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण आहे. आजही निफ्टीला २३,८४० च्या पातळीवर प्रतिकाराचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 16:08 IST2024-12-26T16:08:51+5:302024-12-26T16:08:51+5:30

Stock Market : शेवटच्या ३ सीरिजमध्ये बाजार १०% खाली बंद झाला. जून २०२२ नंतर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण आहे. आजही निफ्टीला २३,८४० च्या पातळीवर प्रतिकाराचा सामना करावा लागला.

stocks market today nifty sensex ends flat after rangebound session top gainers losers | सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या सीरिजमध्ये घसरणीसह बंद! या शेअर्समध्ये सर्वाधिक पडझड

सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या सीरिजमध्ये घसरणीसह बंद! या शेअर्समध्ये सर्वाधिक पडझड

Stock Market News : २०२४ वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, अजूनही शेअर बाजार जागेवर यायला तयार नाही. डिसेंबर सीरिज एक्सपायरीच्या दिवशी बाजार सपाट पातळीवर बंद झाला. २१ महिन्यांनंतर, बाजारात सलग तिसऱ्या सीरिजमध्ये घसरण दिसली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक तळापासून सुधारून बंद झाले. ऑटो, फार्मा, पीएसई निर्देशांक वाढीने बंद झाले. तर एफएमसीजी, मेटल, बँकिंग निर्देशांक घसरणीवर बंद झाले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज खालच्या पातळीवर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया ६ पैशांच्या घसरणीसह ८५.२६ वर बंद झाला.

शेवटच्या ३ सीरिजमध्ये बाजार १०% खाली बंद झाला. जून २०२२ नंतर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण आहे. आजही निफ्टीला २३,८४० च्या पातळीवर प्रतिकाराचा सामना करावा लागला.

बाजार कोणत्या पातळीवर बंद झाला?
गुरुवारी दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स ७८,४७२ च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी २३ अंकांच्या किंचित वाढीसह २३,७५० वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक ६८ अंकांच्या वाढीसह ५७,१२६ च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी बँक ६२ अंकांनी घसरून ५१,१७१ पातळीवर बंद झाला.

आज कोणत्या शेअर्समध्ये चढउतार?
अदानी समूहाचे शेअर्स आज तेजीसह बंद झाले. अदानी पोर्ट्स ५% वाढीसह बंद झाले. निफ्टीच्या सर्वात वेगवान शेअर्समध्ये समाविष्ट होते. डिसेंबरच्या विक्रीचे आकडे जाहीर होण्यापूर्वीच ऑटो शेअर्स वाढीसह बंद झाले. बजाज ऑटो, मारुती सुझुकी, M&M मध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. NTPC कडून ७६५ कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्यानंतर BPCL थोड्या वाढीसह बंद झाले.

एफएमसीजी शेअर घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या कमकुवत समभागांच्या यादीत टायटन, एशियन पेंट्स आणि नेस्ले यांचे नाव होते. ओला इलेक्ट्रीकने ३२०० नवीन स्टोअर्स उघडण्याची घोषणा केल्यानंतर याचा सकारात्मक परिणाम शेअर्सवरही पाहायला मिळाला. ओला इलेक्ट्रिक दिवसाच्या उच्चांकावरून ७% खाली बंद झाली. NALCO देखील आज १% वाढीसह बंद झाला. मोबिक्विकमध्येही आज वाढ दिसून आली. या स्टॉकमध्ये आज २३२ कोटी रुपयांचा ब्लॉक डील झाला आहे.

Web Title: stocks market today nifty sensex ends flat after rangebound session top gainers losers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.