Lokmat Money >शेअर बाजार > Stock Markets today: शेअर बाजाराची तेजीसह सुरूवात; Wipro, Kotak Bank, ICICI Lombard मध्ये जोरदार तेजी

Stock Markets today: शेअर बाजाराची तेजीसह सुरूवात; Wipro, Kotak Bank, ICICI Lombard मध्ये जोरदार तेजी

Stock Markets today: देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह उघडले. बाजार ५७ टक्क्यांच्या बुलिश ट्रेंडसह व्यवहार करत होता. सेन्सेक्सनं २०० अंकांची उसळी घेतली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 09:41 IST2025-01-20T09:41:37+5:302025-01-20T09:41:37+5:30

Stock Markets today: देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह उघडले. बाजार ५७ टक्क्यांच्या बुलिश ट्रेंडसह व्यवहार करत होता. सेन्सेक्सनं २०० अंकांची उसळी घेतली होती.

Stock Markets today Stock market starts with a bullish start Wipro Kotak Bank ICICI Lombard see strong gains | Stock Markets today: शेअर बाजाराची तेजीसह सुरूवात; Wipro, Kotak Bank, ICICI Lombard मध्ये जोरदार तेजी

Stock Markets today: शेअर बाजाराची तेजीसह सुरूवात; Wipro, Kotak Bank, ICICI Lombard मध्ये जोरदार तेजी

Stock Markets today: देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह उघडले. बाजार ५७ टक्क्यांच्या बुलिश ट्रेंडसह व्यवहार करत होता. सेन्सेक्सनं २०० अंकांची उसळी घेतली होती. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये ५० अंकांची तेजी दिसून आली आणि तो २३,२५० च्या आसपास होता. बँक निफ्टी १५५ अंकांच्या वाढीसह ४८,७०६ च्या पातळीवर उघडला. बँक निफ्टी २९४ अंकांनी वधारून ४८,८३४ वर उघडला. करन्सी मार्केटमध्ये रुपया १४ पैशांनी मजबूत होऊन ८६.४७ रुपये प्रति डॉलरवर पोहोचला.

सकाळी निफ्टी २५ अंकांच्या किरकोळ वाढीसह २३,२९३ च्या आसपास व्यवहार करत होता. प्री-ओपनिंगमध्ये तेजीसह कामकाज सुरू होण्याचे संकेत मिळत होते. अमेरिकेच्या वायदा बाजारात किंचित घसरण झाली. अमेरिकेतील शेअर बाजार आज बंद राहणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. ते दुसऱ्यांदा पदभार स्वीकारणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. शुक्रवारी डाऊ जवळपास साडेतीनशे अंकांनी वधारला, त्यानंतर दोन दिवस घसरणीनंतर नॅसडॅकनं ३०० अंकांची झेप घेतली. आज सकाळी निक्केईनं जवळपास ५०० अंकांची झेप घेतली.

शुक्रवारच्या घसरणीत एफआयआयनं कॅश, इंडेक्स आणि शेअर फ्युचर्समध्ये सुमारे ६६०० कोटी रुपयांची विक्री केली. तर दुसरीकडे देशांतर्गत फंडांनी सलग २३ व्या दिवशी २५०० कोटींहून अधिक रकमेच्या शेअर्सची खरेदी केली.

टेलिकॉम शेअर्सवर आज नजर असेल. टेलिकॉम कंपन्यांना एजीआर थकबाकीमध्ये एक लाख कोटी रुपयांचा मोठा दिलासा मिळू शकतो. अर्ध व्याज आणि संपूर्ण दंड माफ करण्याचा सरकार विचार करत आहे. शुक्रवारी विप्रो आणि आयसीआयसीआय लोम्बार्डचा उत्कृष्ट निकाल लागला होता. तर, कोटक बँक, टेक महिंद्रा, इंडियन हॉटेल्स आणि जिओ फायनान्शियलची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली आणि आरबीएल बँकेचा निकाल अत्यंत खराब होता. आज एमसीएक्स, पेटीएम, एल अँड टी फिन, डिक्सन आणि झोमॅटोसह ९ एफ अँड ओ कंपन्या निकाल जाहीर करणार आहेत.

Web Title: Stock Markets today Stock market starts with a bullish start Wipro Kotak Bank ICICI Lombard see strong gains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.