Stock Markets Today: ट्रम्प टॅरिफच्या दहशतीमुळे सलग तीन दिवस घसरण पाहायला मिळत असलेल्या जगभरातील बाजारांमध्ये आता सुधारणा दिसून येत आहे. गिफ्ट निफ्टीनं ४०० अंकांची झेप घेत २२,६५० वर झेप घेतली. तर डाऊ फ्युचर्समध्येही ५०० अंकांची वाढ झाली आहे. निक्केईनं १७०० अंकांची झेप घेतली आहे. एफआयआय-डीआयआयची २८ फेब्रुवारीनंतरची ही सर्वात मोठी अॅक्शन पाहायला मिळत आहे. कालच्या मोठ्या घसरणीत एफआयआयनं निव्वळ १०५०० कोटींची विक्री केली होती, ज्यात ९००० कोटी रुपयांची कॅश होती, तर देशांतर्गत फंडांनी १२१०० कोटी रुपयांची मोठी खरेदी केली होती.
देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात बंपर तेजीसह झाली आहे. सेन्सेक्स १२०० अंकांच्या तेजीसह व्यवहार करत होता. निफ्टी ४०० अंकांनी वधारला होता. बँक निफ्टीही जवळपास ८०० अंकांनी वधारला. निफ्टी मिडकॅप १०० मध्येही १००० अंकांची वाढ झाली. बाजारपेठेत सर्वत्र खरेदी झाली. निफ्टीचे पन्नासपैकी पन्नास शेअर्स ग्रीन मार्कमध्ये उघडले. बीईएल, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील मध्ये सर्वाधिक वाढ झाली.
अनेक वर्षांच्या वादानंतर पती-पत्नीमध्ये समेट; गौतम सिंघानिया, नवाज मोदी जेके हाऊसमध्ये राहणार एकत्र?
दरम्यान, दुसरीकडे पण चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारयुद्धाची आग पेटली आहे. चीनच्या प्रत्युत्तरात्मक शुल्कानंतर ट्रम्प यांनी ५० टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याची धमकी दिली होती. यामुळे चीनवरील एकूण शुल्क १०४ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. कच्च्या तेलाचा भाव दोन टक्क्यांनी घसरून ६५ डॉलरच्या खाली चार वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला. ३ दिवसांत यात १४ टक्क्यांची मोठी घसरण झाली.
सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर काल सोनं ४० डॉलरने घसरून ३००० डॉलर्सच्या खाली आलं, तर चांदी अडीच टक्क्यांनी वधारून ३० डॉलरवर आली. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याचा भाव ११०० रुपयांनी घसरून ८७,००० रुपयांवर तर चांदीचा भाव ११०० रुपयांनी वधारून ८८,५०० रुपयांवर बंद झाला. दहा वर्षांच्या अमेरिकन बाँड यील्डमध्ये सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून ३० बेसिस पॉईंट्सची वाढ होऊन तो ४.२ टक्क्यांवर पोहोचला, तर डॉलर निर्देशांक १०३ टक्क्यांवर पोहोचला.