Stock Market : आज मंगळवारी (२८ ऑक्टोबर) भारतीय शेअर बाजारात दिवसभर मोठा चढ-उतार पाहायला मिळाला. बाजारात अस्थिरता असूनही, प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी ५० जवळजवळ सपाट पातळीवर बंद झाले. महिन्याच्या F&O एक्सपायरीमुळे बाजारात ही जबरदस्त अस्थिरता दिसून आली.
दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स १५०.६८ अंकांनी (०.१८%) घसरला आणि ८४,६२८.१६ च्या पातळीवर बंद झाला. तर, निफ्टी ५० इंडेक्स २९.८५ अंकांनी (०.११%) तुटून २५,९३६.२० च्या पातळीवर स्थिरावला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने ८५,००० च्या जवळ, तर निफ्टीने २६,००० चा टप्पा ओलांडला होता, पण तो कायम राखता आला नाही.
आजचे टॉप गेनर्स स्टॉक्स
आज सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या शेअर्सपैकी टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली.
| कंपनीचे नाव | वाढ (%) |
| टाटा स्टील | जवळपास ३% |
| लार्सन अँड टुब्रो | १.२३% |
| भारतीय स्टेट बँक | ०.८१% |
| कोटक महिंद्रा बँक | ०.५४% |
| भारती एअरटेल | ०.४५% |
आजचे टॉप लूजर्स स्टॉक
दुसरीकडे, टाटा ग्रुपची कंपनी ट्रेंटच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली.
| कंपनीचे नाव | घसरण (%) |
| ट्रेंट | -१.५४% |
| आयसीआयसीआय बँक | -१.०५% |
| टेक महिंद्रा | -१.०३% |
| बजाज फिनसर्व | -१.००% |
| महिंद्रा अँड महिंद्रा | -०.९८% |
