Stock Market Updates: आज वीकली एक्सपायरी आहे, तर दुसरीकडे आठवड्याचं शेवटचे ट्रेडिंग सेशनही आज आहे. उद्या धुलिवंदनाच्या निमित्तानं बाजार बंद राहणार आहे. बुधवारी निफ्टी २७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २२,७४० वर बंद झाला. आज सकाळी निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह २२,५४१ वर उघडला. काही मिनिटांतच तेजी कमी झाली आणि शेअर बाजार फ्लॅट २२,४७० च्या रेंजमध्ये ट्रेड करत होता.
कामकाजादरम्यान पॉवरग्रिड, ओएनजीसी, टाटा स्टील सारख्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर घसरण झालेल्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर महिंद्रा अँड महिंद्रा आणि श्रीराम फायनान्स या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक घसरले आहेत.
दिलासा देणारी बातमी
आज वीकली एक्सपायरी आहे आणि आठवड्याचं शेवटचं ट्रेडिंग सत्रदेखील येथे आहे. उद्या धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजार बंद राहणार आहे. बुधवारी निफ्टी २७ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २२,४७० वर बंद झाला. महागाई दर सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर तर औद्योगिक उत्पादन पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर आहे. हे दोन्ही निर्देशांक अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचे संकेत देत आहेत. महागाईत दिलासा मिळाल्यानं एप्रिलमध्ये आरबीआयच्या पतधोरणात व्याजदरात कपात करण्याची स्थिती अनुकूल असल्याचं दिसत आहे.
जागतिक बाजारात अस्थिरता
जागतिक बाजाराबद्दल बोलायचं झालं तर अस्थिरता असून अखेर डाऊ जोन्स ८२ अंकांनी घसरून बंद झाला. एफआयआयच्या विक्रीचा दबाव सातत्यानं कमी होत आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी काल कॅश मार्केटमध्ये १,६२७ कोटी रुपयांची विक्री केली. आज साप्ताहिक एक्सपायरीमध्ये निफ्टी २२,५५० च्या वर आणि बँक निफ्टी ४८,५०० च्या वर बंद झाला तर आत्मविश्वास मजबूत होईल.