Stock Market: घरगुती शेअर बाजारात मंगळवारी गुंतवणूकदारांना धक्का बसला, जेव्हा शानदार सुरुवातीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीनं अचानक 'यू-टर्न' घेतला. सुरुवातीच्या व्यवहारात बाजार मजबुतीसह हिरव्या चिन्हात होता, मात्र सकाळी ९:३० वाजेपर्यंत दोन्ही प्रमुख निर्देशांक लाल चिन्हात घसरले. या चढ-उतारामुळे गुंतवणूकदार सतर्क झाले असून बाजारात नफावसुली होताना दिसत आहे.
व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स २७८.७३ अंकांच्या वाढीसह ८४,१५६.९० च्या पातळीवर पोहोचला होता. तर निफ्टी ८३.७० अंकांनी वधारून २५,८७३.९५ वर व्यवहार करत होता. परंतु, ९:३० च्या सुमारास बाजारानं अचानक दिशा बदलली. सेन्सेक्स सुमारे १०० अंकांनी तुटून ८३,७७७.९० वर आला, तर निफ्टी ४०.७० अंकांनी घसरून २५,७५०.९५ च्या पातळीवर आला. विश्लेषकांच्या मते, वरच्या स्तरावर झालेली नफावसुली आणि निवडक मोठ्या शेअर्समधील विक्रीमुळे बाजारात ही घसरण आली.
IMPS द्वारे पैसे पाठवणं महागणार; 'या' दिग्गज सरकारी बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका
'या' शेअर्समध्ये तेजी
सुरुवातीच्या तेजीमध्ये ओएनजीसी (ONGC), एचडीएफसी बँक (HDFC Bank), टेक महिंद्रा, हिंदाल्को आणि एचसीएल टेक हे निफ्टीचे टॉप गेनर्स ठरले. या शेअर्समधील खरेदीमुळे आयटी आणि बँकिंग क्षेत्राला आधार मिळाला. मात्र, एल अँड टी (L&T), मॅक्स हेल्थकेअर, टाटा स्टील, इंटरग्लोब एव्हिएशन आणि सिप्ला यांसारख्या दिग्गज शेअर्समध्ये दबाव दिसून आला, ज्यामुळे बाजाराच्या गतीला ब्रेक लागला.
आज 'या' कंपन्यांचे निकाल जाहीर होणार
या दरम्यान, गुंतवणूकदारांचे लक्ष आज जाहीर होणाऱ्या कॉर्पोरेट निकालांकडेही लागले आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स (ICICI Lombard), आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाईफ इन्शुरन्स, टाटा एलेक्सी, ५पैसा कॅपिटल, जस्ट डायल, बँक ऑफ महाराष्ट्र, नवकार कॉर्पोरेशन, ओरिएंटल हॉटेल्स, सिग्मा सॉल्व्ह आणि टोक्यो प्लास्ट इंटरनॅशनल या कंपन्या आज आपले त्रैमासिक निकाल घोषित करणार आहेत.
