Stock Market Today: सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात कमकुवत झाली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला. निफ्टी देखील ५० अंकांनी घसरून २५,७०० च्या खाली आला. बँक निफ्टी ३० अंकांनी वाढून व्यवहार करत होता. तथापि, व्यापक बाजार घसरणीतून सावरत असल्याचं दिसून आलं. स्मॉलकॅप निर्देशांक १०० अंकांनी वाढला, तर मिडकॅप निर्देशांक ४०-५० अंकांनी वाढला. पीएसयू बँक, मेटल आणि ऑटो निर्देशांकांमध्ये जोरदार वाढ दिसून येत होती.
निफ्टी ५० वर, श्रीराम फायनान्स, एम अँड एम, इंडिगो, एसबीआय, ओएनजीसी, अपोलो हॉस्पिटल आणि आयशर मोटर्स सर्वाधिक वाढले. मारुती, बीईएल, टायटन, इटरनल, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, अॅक्सिस बँक आणि डॉ. रेड्डी हे सर्वाधिक तोट्यात होते.
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
शुक्रवारी अमेरिकेचे बाजार चढ-उतारानंतर मजबुतीसह बंद झाले. डाऊ जोंस ४० अंकांनी वर, तर नॅसडॅक १५० अंकांनी वधारला. दुसरीकडे, गिफ्ट निफ्टी ५० अंकांनी घसरून २५,८५० च्या आसपास व्यवहार करत आहे, तर डाऊ फ्युचर्स १२५ अंकांनी मजबूत दिसत आहे. आज जपानचे बाजार बंद राहतील.
विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांची स्थिती
शुक्रवारी एफआयआय (विदेशी संस्थागत गुंतवणूकदार) यांनी कॅश मार्केटमध्ये ₹६,७७० कोटींची विक्री केली आणि एकूण मिळून नेट ₹९,३२१ कोटी बाजारातून काढले. याउलट, डीआयआयनं सलग ४६ व्या दिवशी खरेदी सुरू ठेवत ₹७,०७० कोटींची मोठी खरेदी केली.
आजच्या बाजाराच्या हालचालीत सरकारी आकडेवारी, कॉर्पोरेट निकाल आणि जागतिक ट्रेंड्स महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. एफआयआयची विक्री आणि डॉलरची मजबूती यांमध्ये डीआयआयची खरेदी आणि मजबूत आर्थिक आकडेवारी बाजाराच्या भावनांना पाठिंबा देऊ शकतात.
सरकारी आघाडीवर मजबूत आकडेवारी
१. सरकारी खर्च आणि वित्तीय तूट नियंत्रणात: सरकारच्या खर्चात ४० टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतच सरकारनं आपल्या कॅपिटल एक्सपेंडिचर टार्गेटचा ५२ टक्के भाग पूर्ण केला आहे. यासोबतच, वित्तीय तूटदेखील ३६.५ टक्क्यांवर असल्यानं ती नियंत्रणात राहिली आहे.
२. जीएसटी संकलन दमदार: ऑक्टोबर महिन्यातील जीएसटी संकलन ४.६ टक्क्यांनी वाढून ₹१.९६ लाख कोटींवर पोहोचले आहे. कर दरांमध्ये कपात करूनही हा आकडा अर्थव्यवस्थेची मजबुती दर्शवतो.
