Stock Market Today: आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, देशांतर्गत बाजाराची सुरुवात चांगली झाली. बाजार तेजीसह उघडला. सेन्सेक्स ४२७ अंकांनी वाढून ८४,९०८ वर व्यवहार करत होता. दरम्यान, निफ्टी १२१ अंकांनी वाढून २५,९३६ वर पोहोचला. बँक निफ्टी १५० अंकांनी वाढून ५९,०६० च्या आसपास व्यवहार करत होता.
एनएसईवरील सर्व क्षेत्रीय निर्देशांक ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. हेल्थकेअर आणि फार्मा निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक वाढले. शिवाय, रिअल्टी, ऑटो, आयटी, पीएसयू बँका, खाजगी बँका, मीडिया आणि तेल आणि नॅचरल गॅस जोरदार वाढ दिसून येत होती. निफ्टी ५० वर टीएमपीव्ही, बीईएल, मॅक्स हेल्थकेअर, रिलायन्स, जिओ फिन, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस आणि एटर्नल यात सर्वाधिक तेजी दिसून आली. फक्त श्रीराम फायनान्स, एचसीएल टेक आणि एचडीएफसी लाईफ रेड झोनमध्ये व्यवहार करत होते.
परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी खरेदी बाजारातील भावनांना आधार देत असताना, अमेरिकेतील चलनवाढीच्या आकडेवारीमुळे जागतिक बाजारपेठांना मोठा दिलासा मिळाला आहे. कमोडिटीज, आयपीओ लिस्टिंग आणि निवडक स्टॉकशी संबंधित बातम्या देखील आजच्या व्यापाराची दिशा ठरवतील.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) सलग दुसऱ्या दिवशी रोख बाजारात अंदाजे ₹६०० कोटींची खरेदी केली. तरीही, निर्देशांक आणि डेरिव्हेटिव्ह्जसह निव्वळ FII खरेदी ₹२,७२१ कोटींवर राहिली. देशांतर्गत फंडांनीही सलग ७९ व्या दिवशी त्यांची विक्रमी खरेदी सुरू ठेवली, बाजारात अंदाजे ₹२,७०० कोटींची गुंतवणूक केली. यावरून स्पष्ट होतं की मोठ्या गुंतवणूकदारांचा सध्याच्या पातळीवर बाजारावर विश्वास आहे.
