Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी (१५ जानेवारी) जागतिक बाजारातून स्थिर संकेत मिळत आहेत. गिफ्ट निफ्टी १८ अंकांच्या वाढीसह २३,२९० वर व्यवहार करत होता. मंगळवारी अमेरिकन बाजारात अस्थिरतेचं वातावरण होतं. डाऊ २२० अंकांनी वधारून दिवसाच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला, तर नॅसडॅक २२५ अंकांनी घसरून सलग पाचव्या दिवशी ४० अंकांनी घसरला. डिसेंबरच्या सीपीआयच्या आकडेवारीपेक्षा आज डाऊ फ्युचर्स जवळपास ५० अंकांनी वधारला होता. तर दुसरीकडे निक्केई फ्लॅट होता.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
देशांतर्गत फंडांनी सलग २० दिवसांत ७,९०० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर एफआयआयनं बाजारातील तेजीतही ८,१०० कोटी रुपयांची मोठी विक्री केली. आज निफ्टीवरील HDFC Life चे निकाल जाहीर केले जातील. तर वायद्यात L&T Tech आणि Oracle वर नजर असेल.
कच्च्या तेलाच्या दरात घसरण
कमॉडिटी बाजारात तीन दिवसांच्या तेजीनंतर कच्च्या तेलाचा भाव एका टक्क्यानं घसरून ८१ डॉलरच्या खाली आला. सोनं १५ डॉलर्सनं वधारून २६९० डॉलर्सवर तर चांदी ३० डॉलर्सच्या वर स्थिरावली. आंतरराष्ट्रीय बाजारात रॉ शुगरचे दर पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरले. जागतिक पुरवठा पूर्वपदावर येण्याच्या अपेक्षेनं दबाव दिसून आला.