lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > सकाळच्या तेजीनंतर शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद

सकाळच्या तेजीनंतर शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 04:09 PM2024-05-15T16:09:56+5:302024-05-15T16:10:29+5:30

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली. 

Stock Market Today: Stock market rumbles after morning rally, Sensex-Nifty close lower | सकाळच्या तेजीनंतर शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद

सकाळच्या तेजीनंतर शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद

Stock Market Closing Bell On 15 May 2024: दोन दिवसांच्या तेजीनंतर देशांतर्गत शेअर बाजार बुधवारी(दि.15) लाल रंगात बंद झाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स 118 अंकांनी घसरुन 72,987 वर बंद झाले, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 17 अंकांनी घसरून 22,200 वर बंद झाले. एफएमसीजी, बँकिंग आणि ऑटो शेअर्सच्या प्रॉफिट बुकिंगमुळे ही घसरण पाहायला मिळाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सने मात्र चांगली कामगिरी केली. 

मार्केट कॅपमध्ये 2.50 लाख कोटींची वाढ
आजच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजारात घसरण झाली असली तरी बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सच्या बाजार भांडवलात जोरदार वाढ झाली आहे. बीएसईचे मार्केट कॅप 404.37 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे, जे गेल्या सत्रात 401.90 लाख कोटी रुपयांवर आले होते. म्हणझेच, आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये 2.47 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली.

आजच्या व्यवहारात एनर्जी, फार्मा, मेटल्स, रिअल इस्टेट, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मजबूत वाढ दिसून आली. 

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: Stock Market Today: Stock market rumbles after morning rally, Sensex-Nifty close lower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.