Stock Market Today: आज शेअर बाजारात कामजाच्या सुरुवातीला फ्लॅट ट्रेडिंग दिसून आले. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीनं जोर धरला. सेन्सेक्स २ अंकांनी वधारून ७३,८३० वर उघडला. निफ्टी ४४ अंकांनी घसरून २२,३५३ वर खुला झाला. बँक निफ्टी १५९ अंकांनी वधारून ४८,२१९ वर पोहोचला. तर, रुपया १० पैशांनी मजबूत होऊन ८६.९०/डॉलरवर पोहोचला मात्र, बाजार उघडताच सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला. निफ्टीनंही १३० अंकांच्या तेजीसह व्यवहार सुरू केला.
सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर आयटी आणि रियल्टी सेक्टर निर्देशांकांना सुरुवातीच्या व्यवहारात विक्रीचा सामना करावा लागला. तर निफ्टी मेटल, एफएमसीजी, फार्मा, कन्झ्युमर आणि ऑटो सेक्टरच्या निर्देशांकात खरेदी दिसून आली.
या शेअर्समध्ये तेजी/घसरण
कामकाजादरम्यान इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा, बजाज फायनान्स आणि झोमॅटोच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे हिंदुस्तान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
गेल्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये जोरदार चढ-उतार झाल्यानंतर अमेरिकन बाजारात सुधारणा दिसून आली. टेक शेअर्समधील खरेदीमुळे डाऊ जोन्स जवळपास १५० अंकांनी वधारला, तर नॅसडॅक १०० अंकांनी वधारला. त्याचबरोबर भारतीय बाजारातही तेजी येण्याची चिन्हे आहेत. गिफ्ट निफ्टी १२५ अंकांच्या वाढीसह २२,५७५ च्या जवळ व्यवहार करत होता, ज्याचा बाजारात सकारात्मक कल दिसून येत आहे. डाऊ फ्युचर्स १५० अंकांनी कमकुवत असला तरी निक्केईनं ४५० अंकांची उसळी नोंदविली, ही आशियाई बाजारांसाठी आनंदाची बातमी आहे.