Stock Market Today: शेअर बाजाराची सुरुवात आज जोरदार विक्रीनं झाली आहे. सेन्सेक्स ४५० अंकांनी तर निफ्टी १५० अंकांनी घसरला. बँक निफ्टीमध्येही ३३० अंकांची घसरण पाहायला मिळत आहे. या विक्रीचा सर्वाधिक फटका ऑटो सेक्टरलाबसत आहे. हीच घसरण रियल्टीमध्ये पाहायला मिळतेय.
दरम्यान, एचडीएफसी लाईफ, इन्फोसिस, हीरो मोटोकॉर्प, टाटा स्टील आणि महिंद्राच्या शेअर्समध्ये आज घसरण दिसून आली. तर दुसरीकडे सनफार्मा, सिप्ला, एशियन पेंट्स, बजाज फीनसर्व्ह आणि ग्रासिम या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी केवळ भारतीय शेअर बाजारातच नव्हे तर अमेरिकेच्या शेअर बाजारातही संमिश्र कामगिरी पाहायला मिळाली. डाऊ जोन्स १६५ अंकांनी घसरला, तर नॅसडॅक सलग तिसऱ्या दिवशी ८० अंकांनी वधारून दिवसाच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. दरम्यान, आज देशांतर्गत बाजारात किरकोळ घसरण दर्शवत गिफ्ट निफ्टी जवळपास ३५ अंकांनी घसरून २२,९५० च्या पातळीवर पोहोचला. आज अमेरिकी बाजारात सुट्टी असल्यानं डाऊ फ्युचर्स फ्लॅट व्यवहार करत आहे, तर निक्केई २५ अंकांनी घसरला.
शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. तो आपल्या आजवरच्या उच्चांकी पातळीवरून सुमारे ५० डॉलरनं घसरून २,९०० डॉलरवर आला.