Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Today: १०० अंकांच्या तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Tata Motors, Coal India, Axis Bank मध्ये मोठी खरेदी

Stock Market Today: १०० अंकांच्या तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Tata Motors, Coal India, Axis Bank मध्ये मोठी खरेदी

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारानं गुरुवारी (८ मे) तेजीसह कामकाजस सुरुवात केली. सेन्सेक्स १०० अंकांच्या तेजीसह व्यवहार करत होता. तर निफ्टी २० अंकांनी वधारला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 09:54 IST2025-05-08T09:54:04+5:302025-05-08T09:54:04+5:30

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारानं गुरुवारी (८ मे) तेजीसह कामकाजस सुरुवात केली. सेन्सेक्स १०० अंकांच्या तेजीसह व्यवहार करत होता. तर निफ्टी २० अंकांनी वधारला.

Stock Market Today Stock market opens with 100 point gain Bank Nifty rises Big buying in Tata Motors Coal India Axis Bank | Stock Market Today: १०० अंकांच्या तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Tata Motors, Coal India, Axis Bank मध्ये मोठी खरेदी

Stock Market Today: १०० अंकांच्या तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Tata Motors, Coal India, Axis Bank मध्ये मोठी खरेदी

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारानं गुरुवारी (८ मे) तेजीसह कामकाजस सुरुवात केली. सेन्सेक्स १०० अंकांच्या तेजीसह व्यवहार करत होता. तर निफ्टी २० अंकांनी वधारला. बँक निफ्टी उघडल्यानंतर किमान २५० अंकांनी वधारला होता. मिडकॅप निर्देशांकही तेजीत होता. मात्र, बाजारही वरच्या पातळीवरून घसरताना दिसला. टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, कोल इंडिया अशा निफ्टी ५० शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसून आली. फायनान्शियल सर्व्हिसेस, निफ्टी आयटी, प्रायव्हेट बँक या निर्देशांकांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. तर एफएमसीजी, हेल्थकेअर आणि फार्मा इंडेक्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.

मागील बंदच्या तुलनेत सुरुवातीचे आकडे पाहता सेन्सेक्स १६६ अंकांनी वधारून ८०,९१२ वर उघडला. निफ्टी १७ अंकांनी वधारून २४,४३१ वर उघडला. बँक निफ्टी १९१ अंकांनी वधारून ५४,८०१ वर उघडला. तर दुसरीकडे चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ८४.८३/डॉलर वर आला.

रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?

बाजाराच्या ट्रेंडबद्दल बोलायचं झालं तर सध्या बाजारासाठी आनंदाची बातमीही येत आहे. पण आज निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. बाजारासाठी निफ्टीकडून किंचित मंद संकेत मिळत आहेत. पण जागतिक बाजारात तेजी आहे. आज दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं जाईल. पहिली गोष्ट म्हणजे भारत-पाकिस्तान तणावावर. दुसरी म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मोठा व्यापार करार करण्यात यश आल्याचे संकेत दिले आहेत आणि या वाटाघाटीत भारत ज्या प्रकारे पुढे गेला आहे, त्यामुळे हा करार भारतासोबत होण्याची दाट शक्यता आहे. पण ते ब्रिटन, भारत किंवा जपान असू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.

Web Title: Stock Market Today Stock market opens with 100 point gain Bank Nifty rises Big buying in Tata Motors Coal India Axis Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.