Stock Market Today: शेअर बाजाराची सुरूवात ग्रीन झोनमध्ये झाली असली तरी लगेचच बाजार रेड झोनमध्ये गेला. सेन्सेक्स ७६ रुपयांच्या वाढीसह ७५,९९६.८६ वर तर निफ्टी ४ अंकांनी वधारून २२,९६३ वर उघडला. मात्र त्यानंतर त्यात घसरण झाली. सोन्याच्या दरातही किंचित वाढ झाली. सकाळी सोनं ३१७ रुपयांनी वधारून ८५,३७२ रुपयांवर पोहोचले. मात्र, निफ्टीच्या आयटी निर्देशांकात तेजी दिसून येत आहे. तर मेटल, फायनान्स, एफएमसीजी यांसारख्या मुख्य क्षेत्रातील निर्देशांकांमध्ये घसरण झाली आहे.
कामकाजादरम्यान टेक महिंद्रा, सनफार्मा, मारुती, एचसीएलटेक, एम अँड एम या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे एसबीआय, इंडसइंड बँक, एनटीपीसी, टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
गेल्या ८ दिवसांपासून ज्या प्रकारे बाजारात घसरण पाहायला मिळत होती आणि काल अचानक बाजारात सुधारणा सुरू झाल्यानं गुंतवणूकदारांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला. त्यामुळेच आज शेअर बाजारात संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. गिफ्ट निफ्टी २३,०५० च्या आसपास फ्लॅट व्यवहार करत होता, तर डाऊ फ्युचर्समध्ये ७० अंकांची वाढ दिसून आली. काल अमेरिकन बाजार बंद होते.
सोन्याची स्थिती काय?
सोन्या-चांदीच्या दरात किंचित चढ-उतार होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव २,९०० डॉलर प्रति औंसच्या वर होता, तर चांदीचा भाव ३३ डॉलर प्रति औंस होता. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याचा भाव ४०० रुपयांनी वधारून ८५,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाला, तर चांदीचा भाव ९५,६०० रुपयांवर स्थिर राहिला. कच्च्या तेलाचा भाव १ टक्क्यांनी वधारला असून तो ७५ डॉलर प्रति बॅरलच्या वर व्यवहार करत होता.