Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, निफ्टी २३ हजारांच्या खाली; IT-मेटल शेअर्स घसरले

Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, निफ्टी २३ हजारांच्या खाली; IT-मेटल शेअर्स घसरले

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी (27 जानेवारी) घसरणीसह सुरुवात झाली. निफ्टी २३,००० च्या खाली घसरला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी १६१ अंकांनी घसरून २२,९३० वर आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 10:05 IST2025-01-27T10:05:50+5:302025-01-27T10:05:50+5:30

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी (27 जानेवारी) घसरणीसह सुरुवात झाली. निफ्टी २३,००० च्या खाली घसरला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी १६१ अंकांनी घसरून २२,९३० वर आला.

Stock Market Today Stock market hit hard Nifty below 23 thousand IT metal shares fell | Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, निफ्टी २३ हजारांच्या खाली; IT-मेटल शेअर्स घसरले

Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, निफ्टी २३ हजारांच्या खाली; IT-मेटल शेअर्स घसरले

Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी (27 जानेवारी) घसरणीसह सुरुवात झाली. निफ्टी २३,००० च्या खाली घसरला. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी १६१ अंकांनी घसरून २२,९३० वर आला. सेन्सेक्स ५५० अंकांनी घसरून ७५,६३९ च्या पातळीवर होता. बँक निफ्टीमध्ये जवळपास ४६० अंकांची घसरण झाली असून निर्देशांक ४७,९१० च्या आसपास होता. मिडकॅप निर्देशांक ९०० अंकांनी तर स्मॉलकॅप निर्देशांक ५५० अंकांनी घसरला. इंडिया व्हीआयएक्स ६ टक्क्यांनी वधारला. रियल्टी वगळता जवळपास सर्वच क्षेत्रनिर्देशांक घसरत होते. परंतु आयटी आणि मेटल निर्देशांकात सर्वाधिक घसरण दिसून आली.

ब्रिटानिया आणि डॉ. रेड्डीज निफ्टीवर यामध्ये सुरुवातीला तेजी दिसून आली. त्यापाठोपाठ एचयूएल, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंटमध्येही तेजी दिसून आली. बीईएल, श्रीराम फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी केवळ ५ शेअर्स ग्रीन झोनमध्ये होते. एफएमसीजी शेअर्स आणि आयसीआयसीआय बँक, एशियन पेंटसारख्या शेअर्स ग्रीन झोनमध्ये होते.

सकाळी गिफ्ट निफ्टी १७१ अंकांनी घसरून २२,९४२ च्या आसपास होता. प्री-ओपनिंगमध्ये निफ्टी २३,००० च्या खाली उघडण्याची चिन्हं होती. अमेरिकेच्या वायदा बाजारातही घसरण दिसून आली. नॅसडॅक फ्युचर्स दीड टक्क्यांनी घसरला होता. तत्पूर्वी, शुक्रवारी चार दिवसांच्या तेजीनंतर अमेरिकी बाजारात किरकोळ नफावसुली झाली. छोट्या रेंजमधील व्यवहारादरम्यान डाऊ सुमारे १५० अंकांनी घसरला, तर नॅसडॅक १०० अंकांनी घसरला. एस अँड पी ५०० ने सलग तिसऱ्या दिवशी उच्चांक गाठला आणि किरकोळ घसरणीसह बंद झाला. सकाळी निक्केईमध्ये किंचित वाढ दिसून आली.

Web Title: Stock Market Today Stock market hit hard Nifty below 23 thousand IT metal shares fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.