Stock Market Today: मंगळवारी, निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजार लक्षणीय घसरणीसह उघडला. सेन्सेक्स ३०० अंकांनी खाली व्यवहार करत होता. दरम्यान, निफ्टी जवळजवळ १०० अंकांनी घसरला होता. बँक निफ्टी देखील १७० अंकांनी खाली होता. ब्रॉडर मार्केटदेखील देखील रेड झोनमध्ये व्यवहार करत होता. आज सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते, विशेषतः आयटी, रिअल्टी, मेटल आणि बँकिंग क्षेत्रांमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली.
मागील बंदच्या तुलनेत, सेन्सेक्स १८८ अंकांनी घसरुन ८५,२१३ वर उघडला. निफ्टी ७६ अंकांनी घसरुन २५,९५१ वर उघडला. बँक निफ्टी १७६ अंकांच्या घसरणीसह ५९,२८८ वर उघडला. चलन बाजारात, रुपया ६ पैशांनी कमकुवत होऊन ९०.७९/ डॉलर्सवर उघडला.
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
बाजार उघडण्यापूर्वी, जागतिक आणि देशांतर्गत दोन्ही आघाड्यांवर गुंतवणूकदारांसाठी अनेक महत्त्वाचे संकेत समोर येत आहेत. अमेरिकन बाजारपेठेतील घसरण, कच्च्या तेलाच्या किमती कमी होणं आणि एफआयआयकडून विक्री सुरू राहिल्यानं भावना काही प्रमाणात दबावाखाली असल्याचं दिसून येतं. तर स्थानिक पातळीवर, आयपीओ, धोरणात्मक निर्णय आणि मॅक्रो डेटा बाजाराची दिशा ठरवू शकतात.
अमेरिकन बाजारपेठेत नफा वसुली
अमेरिकन शेअर बाजारांनी जोरदार सुरुवात केल्यानंतर नफा वसुलीचं प्रमाण वाढलं. एआय स्टॉक्समध्ये सातत्यानं विक्री झाल्यामुळे डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी दिवसाच्या उच्चांकावरून जवळजवळ २५० अंकांनी घसरला आणि शेवटी ४० अंकांनी घसरुन बंद झाला. नॅस्डॅक जवळजवळ १४० अंकांनी घसरून तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला, तर एस अँड पी दबावाखाली राहिला. आज नोव्हेंबरच्या रोजगार डेटापूर्वी डाऊ फ्युचर्स जवळजवळ स्थिर व्यवहार करत आहेत.
