Stock Market Today: शेअर बाजारात आज जोरदार विक्री पाहायला मिळाली. सेन्सेक्स १३८ अंकांनी घसरून ८२,०३८ वर उघडला. तर निफ्टी ४५ अंकांनी घसरून २४,९५६ वर खुला झाला. बँक निफ्टी ११४ अंकांनी घसरून ५५,४५८ वर उघडला. तर, रुपया ८५.०९ च्या तुलनेत ८५.१५/डॉलरवर उघडला. आज मिडकॅप शेअर्समध्ये विक्री दिसून आली. मात्र, स्मॉल कॅपमध्ये खरेदीचा बोलबाला होता. सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर निफ्टी, पीएसयू बँक आणि हेल्थकेअर वगळता सर्व निर्देशांक रेड झोनमध्ये व्यवहार करताना दिसले.
कामकाजादरम्यान इंडसइंड बँक आणि सनफार्माच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. तर इटर्नल, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी आणि अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
अधिक हालचाल दिसण्याची शक्यता
आज भारतीय शेअर बाजारात काही हालचाल होण्याची शक्यता आहे. यामागे अनेक कारणं आहेत. सर्वप्रथम, डेरिव्हेटिव्ह्जच्या मुदतीबद्दल बोलताना, सेबीनं सर्व स्टॉक एक्सचेंजना १५ जूनपर्यंत डेरिव्हेटिव्ह करार मंगळवारी किंवा गुरुवारी संपतील की नाही हे ठरवण्याचे निर्देश दिले आहेत. आता कोणत्याही बदलासाठी नियामक मंजुरी आवश्यक असेल. बाजारातील पारदर्शकता आणि स्थिरता राखण्याच्या दृष्टीनं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे.
दरम्यान, GIFT निफ्टीमध्ये थोडीशी वाढ दिसून आली आणि तो २५०५० च्या जवळ व्यवहार करत आहे. त्याच वेळी, डाऊ फ्युचर्समध्ये सुमारे ३७५ अंकांची मोठी तेजी दिसून आली. अमेरिकन बाजार काल बंद होते, परंतु त्यांचे संकेत सकारात्मक दिसत आहेत.