Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदार बुलिश

Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदार बुलिश

Stock Market Today: शेअर बाजारात आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स ३८६ अंकांनी वधारून ८२,५७४ वर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 10:05 IST2025-06-09T10:05:21+5:302025-06-09T10:05:21+5:30

Stock Market Today: शेअर बाजारात आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स ३८६ अंकांनी वधारून ८२,५७४ वर उघडला.

stock market today Sensex opens with a gain of 386 points investors bullish on psu banks and realty sectors | Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदार बुलिश

Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदार बुलिश

Stock Market Today: शेअर बाजारात आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स ३८६ अंकांनी वधारून ८२,५७४ वर उघडला. निफ्टी १५७ अंकांनी वधारून २५,१६० वर पोहोचला. बँक निफ्टी ४७१ अंकांनी वधारून ५७,०४९ वर उघडला. तर रुपया ८५.६३ च्या तुलनेत ८५.६४/डॉलरवर उघडला.

सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचं झालं तर गुंतवणूकदार आज सुरुवातीच्या व्यवहारात पीएसयू बँका आणि रियल्टी सेक्टरवर तेजीचे दिसत आहेत. हे दोन्ही क्षेत्र जवळपास १ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत. मात्र, आज जवळपास सर्वच क्षेत्रांत तेजी दिसून येत आहे. सर्वच क्षेत्रातील शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत.

हेही वाचा - Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर

यामध्ये तेजी/घसरण

कामकाजादरम्यान टाटा मोटर्स, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, एल अँड टी आणि मारुतीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर अल्ट्राटेक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, इटर्नलच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

शुक्रवारी जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत प्रचंड वाढ झाली. याचं कारण अमेरिकन बाजारपेठेत मजबूत रोजगाराची आकडेवारी होती. टेक शेअर्समध्ये मजबूतीमुळे डाउ जोन्स ४५० अंकांनी वाढून बंद झाला, तर नॅस्डॅक २२५ अंकांनी वधारला. फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच एस अँड पी ५०० निर्देशांक ६००० च्या वर बंद झाला, जो गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास दर्शवितो. अमेरिका आणि चीनमधील व्यापार कराराबद्दलही मोठी बातमी आली. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ लंडनमध्ये चीनसोबत व्यापार करारावर चर्चा सुरू करणार आहे. याची घोषणा स्वतः अध्यक्ष ट्रम्प यांनी केली. ही बातमी बाजारासाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे.

Web Title: stock market today Sensex opens with a gain of 386 points investors bullish on psu banks and realty sectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.