Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी

Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी

Stock Market Today:  शेअर बाजारात आज मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स ३५० अंकांनी वधारून ७८,९०३ वर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 09:46 IST2025-04-21T09:46:00+5:302025-04-21T09:46:00+5:30

Stock Market Today:  शेअर बाजारात आज मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स ३५० अंकांनी वधारून ७८,९०३ वर उघडला.

Stock Market Today Sensex opens with a gain of 349 points Bank Nifty records Big rise in realty healthcare | Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी

Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी

Stock Market Today:  शेअर बाजारात आज मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स ३५० अंकांनी वधारून ७८,९०३ वर उघडला. निफ्टी ९८ अंकांच्या वाढीसह २३,९४९ वर उघडला. बँक निफ्टी ६०१ अंकांनी वधारून ५४,८९१ वर पोहोचला. रुपया २७ पैशांनी मजबूत होऊन ८५.१० डॉलर वर आला. आजच्या बाजारातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बँक निफ्टीनं आपला सर्वकालीन उच्चांक मोडला. जो व्यवहार सुरू होताच ९०० अंकांनी वधारला.

सेक्टोरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाले तर मेटल, फार्मा आणि रियल्टी मध्ये तेजी दिसून आली, परंतु अल्पावधीतच सर्व रेड मार्कमध्ये ट्रेड करताना दिसले. निफ्टी आयटी निर्देशांकात आज नेत्रदीपक वाढ दिसून येत आहे. त्याचबरोबर पीएसयू आणि खासगी बँकांच्या समभागांमध्येही आज तेजी दिसून येत आहे.

NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं

या शेअर्समध्ये तेजी / घसरण

कामकाजादरम्यान टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय बँक, आयसीआयसीआय बँक यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे आयटीसी, टायटन, सनफार्मा, इटर्नल, अदानी पोर्ट्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

जागतिक व्यापार आणि मुत्सद्देगिरीच्या आघाडीवर आजची सर्वात मोठी बातमी अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरची आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, अमेरिका आणि चीनमध्ये लवकरच चांगला करार होऊ शकतो असे संकेत दिले आहेत. दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळ सुरू असलेल्या ट्रेड वॉरमुळे जागतिक व्यापारात अनिश्चितता निर्माण झाली असताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलम आहे. चर्चा सुरू झाल्याने दोन्ही देशांमधील तणाव आता कमी होईल, अशी आशा गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारत दौऱ्यावर

दरम्यान, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स आज भारताची राजधानी दिल्लीत आले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या चार दिवसांच्या भारत भेटीत शुल्क आणि द्विपक्षीय व्यापार करारांवर सखोल चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या भेटीत अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार सहकार्याला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न दिसून येईल.

Web Title: Stock Market Today Sensex opens with a gain of 349 points Bank Nifty records Big rise in realty healthcare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.