Stock Market Today: कालच्या वीकली एक्सपायरीमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीनंतर, बुधवारी शेअर बाजार थोडा सावध दिसला. मिश्र जागतिक संकेतांमध्ये बाजार मंदावला. प्रमुख बेंचमार्क निर्देशांकात रेड आणि ग्रीन झोनमध्ये चढउतार दिसून आला. सकाळी ९:२५ च्या सुमारास सेन्सेक्स १८० अंकांनी वाढून ८४,८६३ वर व्यवहार करत होता. निफ्टी ६० अंकांनी वाढून २५,९१९ वर होता. बँक निफ्टी ४५ अंकांनी वाढून ५९,०८० वर होता.
बँक आणि एनबीएफसी शेअर्समध्ये वाढ झाली. आज मेटल शेअर्सदेखील वाढले. निफ्टी ५० वर श्रीराम फायनान्स, इटर्नल, आयशर मोटर्स, एसबीआय, हिंडाल्को, अॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्स हे सर्वाधिक वाढणाऱ्यांमध्ये होते. आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया, एचडीएफसी बँक, मॅक्स हेल्थ, एचडीएफसी लाइफ, ट्रेंट आणि इंडिगो यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
ट्रिगर्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर जागतिक संकेत कमकुवत आहेत, एफआयआय विक्री करत आहेत आणि रुपयाची विक्रमी कमकुवतता गुंतवणूकदारांची चिंता वाढवत आहे. परंतु, कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट आणि सोन्याच्या किमतीत वाढ काही क्षेत्रांना आधार देऊ शकते. कामकाजादरम्यान गिफ्ट निफ्टी २५,९५० च्या आसपास स्थिर व्यवहार करत आहे, जो देशांतर्गत बाजारासाठी स्थिर किंवा किंचित कमकुवत सुरुवात दर्शवितो. आशियाई बाजारांमध्येही स्पष्ट दिशा दिसत नाही. डाऊ फ्युचर्स सुमारे ५० अंकांनी खाली आहे.
